Congress Leader Confident of Winning in Local Elections : काँग्रेस नेत्याने डिवचले, स्थानिक निवडणुकीत बाजी मारण्याचा विश्वास
Khamgao “कोणी पक्ष सोडून गेला म्हणून काँग्रेस संपत नाही. काँग्रेस ही केवळ पक्षसंघटना नसून राज्यघटनेच्या मूल्यांना मानणारा एक विचार आहे,” असे प्रतिपादन खामगाव विधानसभा प्रभारी प्रकाश तायडे यांनी केले. काँग्रेसचा विचार शाश्वत असून त्यावरच जनतेचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
खामगाव तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक १४ ऑक्टोबर रोजी सहारा चौपाटी येथे पार पडली. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. बैठकीचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण यांनी भूषविले, तर विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
Vijay Wadetiwar : आधी जरांगे, आता भुजबळ… दोघांनीच मला टार्गेट केलं!
प्रकाश तायडे म्हणाले, “खामगाव मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पुन्हा भरारी घेईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत ताकदीने लढणार आहे. कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, संघटन मजबूत करावे.”
बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, संवाद मेळावे, तालुक्यातील दौरे, तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला प्रल्हादराव सातव, राजाराम काळणे, अजय तायडे, स्वप्निल ठाकरे पाटील, धनंजय देशमुख, ज्ञानेश्वर शेजोळे, किशोरआप्पा भोसले, गजानन वाकुडकर, अस्लम पटेल, चैतन्य पाटील, बबुल पठाण, प्रमोद चिंचोळकर, प्रकाश इंगळे, अनंतराव ताठे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








