Both Factions of the NCP to Be Tested in the Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; कोण स्थिरावणार, कोण होणार बाद?
Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात व्यक्तीनिष्ठा आणि वैयक्तिक करिष्म्यावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता दोन तुकडी झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही गटांची खरी कसोटी लागणार आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ, मलकापूर पट्टा आणि काही प्रमाणात बुलढाणा व लोणार या तालुक्यांपुरता प्रभाव असलेल्या या पक्षाचे भविष्य कोणत्या दिशेने वळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शरद पवार गटाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, तर अजित पवार गटाचे प्रमुख पालकमंत्री मकरंद पाटील आहेत. या दोघांमधील अप्रत्यक्ष दंद्वामुळे दोन्ही गटांचे स्थानिक पातळीवरील अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Prakash Tayde : कोणी पक्ष सोडून गेला म्हणून काँग्रेस संपत नाही
शरद पवार गटात अलीकडे संघटनात्मक बदलांच्या हालचाली दिसून येत आहेत. जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी पक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत डॉ. राजेंद्र शिंगणे हेच पक्षाचे सर्वमान्य आणि ओळखले जाणारे नेतृत्व राहिले आहे.
दुसऱ्या बाजूस अजित पवार गटात जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे दोन प्रमुख चेहरे जिल्ह्यात सक्रिय आहेत. दोघांनाही स्थानिक पातळीवर तसा जनाधार आहे. मात्र, संघटनात्मक एकजूट आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्या गटासमोर आहे.
२०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी विशेष नव्हती. जिल्हा परिषदेवर त्यांना एकही जागा मिळाली नाही, तर पंचायत समित्यांमध्ये केवळ चार आणि पालिकांमध्ये सहा जागा मिळाल्या. एकूण ४८३ पैकी फक्त आठ टक्के जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्या. आता पक्षाचे दोन गट झाल्याने त्या टक्केवारीतही आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनाधार कोणाला मिळतो आणि कोणाचा कमी होतो, हे येणारा काळच ठरवणार आहे.
महायुतीत असूनही अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील छुपा संघर्ष जिल्हा पातळीवर कायम आहे. स्थानिक पातळीवर काही भाजप नेते अजित पवार गटाला पसंत करत नाहीत, अशीही चर्चा आहे. आगामी पालिका निवडणुकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर विरुद्ध माजी आमदार दिलीपकुमार सानंदा असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
Vijay Wadetiwar : आधी जरांगे, आता भुजबळ… दोघांनीच मला टार्गेट केलं!
डॉ. राजेंद्र शिंगणे आणि पालकमंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांतील राजकीय ताकदीच्या लढाईत कोण बाजी मारतो, त्यावरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्ता मिळविण्याची नव्हे, तर दोन्ही गटांच्या अस्तित्वाची प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.








