Breaking

Wardha District Bank : जिल्हा बँकेसाठी धावून आली शिखर बँक!

A helping hand from Shikhar Bank Administrator to District Bank : शिखर बँकेच्या प्रशासकाकडून मदतीचा हात

Wardha अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांच्या मदतीसाठी शिखर बँकेचे प्रशासक धावून आले आहेत. आता सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सक्षमीकरणाचा विचार केला आहे. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.

त्यापैकी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणासाठी मागील वर्षभरात झालेल्या प्रयत्नांची दखल घेऊन राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी बँकेच्या सक्षमीकरणासाठी स्वतःचा वैयक्तिक पाच लाख रुपये ठेवीचा धनादेश केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वर्धा बँकेचे प्रशासक राजेंद्र कौसडीकर यांना सुपूर्द केला.

केंद्रीय सहकार मंत्रालयाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (शिखर बँक) मुंबई येथील मुख्यालयात सुरू केलेल्या सहकार गॅलरीचे उद्घाटन झाले. यावेळी हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती होती.

Gondia Zilla Parishad Elections : काय असेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ?

याप्रसंगी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीदेखील वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरण अभियानाची प्रशंसा केली. या कार्यक्रमास माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर उपस्थित होते.

Illegal sand mining and transportation : लोकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनीच टाकली धाड !

 

अभिमानास्पद बाब
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य आहे. त्यात राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरण अभियानाला सहकार्य मिळाले. ही बाब वर्धा जिल्हा बँकेकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बँकेवरील विश्वास द्विगुणित करणारी आहे. तसेच हे वर्ष वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरण अभियानास गतिमान करणारे ठरेल. असा विश्वास बँकेचे प्रशासक राजेंद्र कौसडीकर यांनी व्यक्त केला.