Ajit Pawar : अमरावती जिल्ह्यासाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

CIIIT Sanctioned for Amravati District : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार, टाटा टेक्नॉलॉजीजचा सकारात्मक प्रतिसाद

Amravati उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीला पत्र लिहून अमरावती जिल्ह्यात ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या पत्राला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, टाटा टेक्नॉलॉजीजने अमरावती जिल्ह्यात हे केंद्र स्थापन करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.

Pravin Tayade : बच्चू कडूंनी सत्तेत असताना बंगला बांधला, कारखाना उभारला

या ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रामुळे स्थानिक युवकांना जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे अमरावतीतील युवकांसाठी जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षणाची दारे उघडली जाणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्रशिक्षण आता जिल्ह्यातच मिळणार असून, त्यामुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल. या माध्यमातून नवउद्योगांना चालना मिळेल, स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमुळे औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षित, कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम युवक मिळतील. नवउद्योगांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था आणि उद्योगविकासाला बळकटी मिळेल, तसेच युवकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल.

युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचा उपक्रम म्हणून या केंद्राला मोठे महत्त्व आहे. या ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रामधून विद्यार्थ्यांना आणि उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.

Bacchu Kadu : तर शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान करू नये

‘रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)’, ‘डेटा अॅनालिटिक्स’, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ अशा अत्याधुनिक क्षेत्रांत युवकांना प्रशिक्षण मिळेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून अमरावती जिल्ह्यात मिळालेले हे ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र राज्याच्या औद्योगिक आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा आशावाद आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला आहे.