Doctor suicide case : “डॉ. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप !

Statewide ‘No Safety, No Service’ movement; sick care : राज्यभर ‘नो सेफ्टी, नो सर्विस’ आंदोलन; रुग्णसेवा ठप्प”

Mumbai : फलटण येथील तरुण डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड संताप उसळला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. “डॉक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी,” या मागणीसाठी मुंबईसह विविध ठिकाणी आंदोलनाची ठिणगी पेटली असून रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे.

फलटणमधील रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तींची नावे नमूद केली होती. पोलिसांनी त्यांना अटक केली असली तरी तपासात होत असलेला विलंब आणि निष्क्रियता पाहता डॉक्टर वर्ग संतप्त झाला आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra politics : “विठ्ठलाचं राज्य म्हणजे अजितदादा मुख्यमंत्री, आमदाराचं साकडं !

मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टरांनी सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली. ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवून डॉक्टरांनी रुग्णालयाच्या गेट नंबर १ परिसरात आंदोलन सुरू केले आहे. “नो सेफ्टी, नो सर्विस!” आणि “डॉ. मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे!” अशी घोषवाक्ये देत रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनात “बेटी पडी पर बची नहीं” अशी पोस्टर्स झळकत आहेत.

डॉक्टर संघटनांनी या प्रकरणात रिटायर्ड न्यायाधीश आणि महिला सदस्यांचा समावेश असलेली विशेष तपास पथक नेमावी, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच डॉ. मुंडे यांच्या कुटुंबाला ५ कोटींची आर्थिक मदत, प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नायर रुग्णालयातील ओपीडी सेवा ठप्प झाल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. फक्त इमर्जन्सी विभाग सुरू ठेवण्यात आला असून, नियमित तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना परत जावं लागलं. आंदोलनात सहभागी डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उद्यापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणंही बंद केली जातील.”

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स कडून काम बंद आंदोलन सुरू आहे. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व ओपीडी आणि नियमित सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. संपदा मुंडे प्रकरणाचा निष्पक्ष तपास आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण लागू करावे, या मागणीसाठी घाटीतील सर्व डॉक्टरांनी एकत्र येत आंदोलनात सहभाग घेतला आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची धुरा अजित पवार यांच्याच हाती !

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले असून, डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारकडून ठोस भूमिका न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे. वैद्यकीय सेवांच्या रक्षणासाठीचं हे आंदोलन आता राज्यव्यापी आंदोलनात रूपांतर होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.