Controversial statement : ‘एक वेळ आई मेली तरी चालेल’… शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य !

Criticism from the opposition, finally the MLAs apologize : विरोधकांकडून टीकेची झोड, अखेर आमदारांची माफी

Mumbai : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरू असलेल्या वक्तव्यांच्या मालिकेत आता शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या विधानामुळे मोठा वाद पेटला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी “मराठी ही माझी आई आहे आणि उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे” असे विधान केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा ऐरणीवर आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या प्रश्नावर भूमिका घेतल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारानेच हिंदी समर्थक विधान केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Doctor suicide case : जयकुमार गोरे कोण तीस मार खान? आधी स्वतःचं चारित्र्य बघावं!

या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उद्धव सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुर्वे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “2022 मध्ये हेच आमदार आईलाच नमस्कार करून बाहेर पडले होते. त्यांना आई आणि मावशी यातील फरक तरी कळतो का? मतांच्या लाचारीसाठी त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.” विरोधकांचा आरोप आहे की, मतदारांची मनधरणी आणि उत्तर भारतीय मतदारांना खूष करण्यासाठीच हे विधान करण्यात आले.

वाद वाढू लागल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी शेवटी माफी मागून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्ट केले की, “मराठी माझी मायमावली आहे. अनावधानाने माझ्याकडून तो शब्द बाहेर पडला. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” असे म्हणत त्यांनी हात जोडून माफी मागितली.

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुर्वे यांच्या बाजूने भूमिका घेतली. “त्यांच्याकडून चुकून हा शब्द बाहेर पडला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. काही जण त्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन राजकीय पोळी भाजत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठी भाषेच्या जतनासाठी काम करत आहोत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात आला आहे.” असे सामंत म्हणाले.

Vote theft : एका घरात ५० नावं नोंदली, मतचोरीचा गंभीर आरोप !

या प्रकरणामुळे निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदारांच्या एका वक्तव्याने केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक संवेदनशीलतेचंही वादळ उठवलं आहे. आता या वादानंतर मतदारांच्या मनात कोणती छाप पडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.