Sajid Khan Pathan and Yashomati Thakur are Congress’s star campaigners : आमदार साजिद खान पठाण व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा समावेश
Akola नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची ४० जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातून आमदार साजिद खान पठाण, तर अमरावती जिल्ह्यातून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
जाहीर केलेल्या यादीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील, ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एआयसीसीचे महासचिव मुकुल वासनिक, खासदार रजनीताई पाटील, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, ॲड. के. सी. पाडवी, खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. विश्वजित कदम, एम. एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, राजेंद्र मुळक, आमदार भाई जगताप, आमदार साजिद खान पठाण, एआयसीसी सचिव सचिन सावंत, प्रवक्ते अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एससी विभागाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादल अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआय अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख यांचा समावेश आहे.
Anil Bonde : इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या फलकावरून निर्माण वाद
यापूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही अकोला पश्चिमचे आमदार साजित खान पठाण यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.








