व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Criticism of government : हे सरकार सत्याच्या बाजूने नाही, धनंजय मुंडेंना वाचवतय...

Criticism of government : हे सरकार सत्याच्या बाजूने नाही, धनंजय मुंडेंना वाचवतय !

manoj jarange patil big statement dhananjay munde allegations : मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर तीव्र टीका

Jalna : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र होत असून मागील काही दिवसांपासून दोघेही एकमेकांवर गंभीर आणि धक्कादायक आरोप करताना दिसत आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट मोठी टीका केली आहे. सरकार धनंजय मुंडेंना वाचवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

धनंजय मुंडे यांनी माझ्या जीवावर कट रचल्याचा आरोप जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर मुंडेंनी सर्व आरोप फेटाळून लावत थेट सीबीआय चौकशीची मागणी केली होती. एवढेच नाही तर “माझी आणि जरांगे यांची नार्को टेस्ट घ्या” असे आव्हानही त्यांनी दिले होते. जरांगेंनीही नार्को टेस्टसाठी तयारी दर्शवली. या प्रकरणात तणाव वाढत असतानाच जरांगेंनी पुन्हा धनंजय मुंडेंवर आणि सरकारवर नवीन आरोप केले आहेत.

Sudhir Mungantiwar : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “हा विषय अत्यंत मोठा आहे. तो (मुंडे) अजित पवारांकडे जाऊन म्हणतो की, या चौकशीपासून मला दूर ठेवा, मला वाचवा. माझ्या लोकांना मराठा समाज मारेल म्हणून मला चौकशीला जाऊ देऊ नका. जर एवढा मोठा कट त्याने रचला असेल आणि अजित पवार व देवेंद्र फडणवीस त्याला क्लीनचिट देत असतील, तर ही फार अवघड गोष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्यांपैकी होतो. पण जर सत्याचे सत्य होत नसेल, सत्याच्या बाजूने सरकार उभे राहत नसेल, तर हे नालायक सरकार आहे. केवळ भाषणातून बोलून उपयोग नाही. तो म्हणतो की, चौकशीपासून मला टाळा आणि अजित पवार-देवेंद्र फडणवीस त्याला साथ देणार असतील, तर ही खूप वाईट गोष्ट आहे.”

Sheikh Hasina : मोठी बातमी! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा;

सरकारवरील विश्वास उडाल्याचा आरोपही त्यांनी केला. “आम्हाला काल रात्री उशीरा माहिती मिळाली की हे सर्व घडत आहे. जर एका निच माणसाला तुम्ही वाचवणार असाल, तर ही सोपी गोष्ट नाही,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, मराठा आरक्षण, वैयक्तिक आरोप आणि सरकारची भूमिका या सर्वांवरून तणाव वाढताना दिसत आहे.

_______

error: Content is protected !!