Politics of defection : भाजपमध्ये भूचाल: माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीरांना सलग दुसरा मोठा हादरा !

BJP leader Hansraj Ahir slams Congress MP Pratibha Dhanorkar’s strategy : काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांच्या रणनीतीचा अहीरांना तडाखा, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री अक्षरशः भूकंप झाला. भद्रावती भाजप शहराध्यक्षपदाचा अचानक राजीनामा देत अॅड. सुनील नामोजवार यांनी काँग्रेसचा ‘हात’ धरला आणि यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना सलग दुसरा मोठा राजकीय हादरा बसला. यापूर्वी मुल नगरपरिषदेत अहीर यांचे दशकभरापासून खंदे समर्थक असलेले प्रशांत समर्थ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत अहीर यांच्या संघटनेच्या किल्ल्याला पहिलेच मोठे भगदाड पाडले होते.

नामोजवारांच्या काँग्रेस एंट्रीनं अहीर गटाचा दुसरा मोठा बुरूज ढासळला, अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे. विशेष म्हणजे अहीरांच्या दोन्ही खंद्या समर्थकांनी काँग्रेसचीच वाट धरली. त्यामुळे काँग्रेसने अहीरांच्या विरोधात आघाडी तर उघडली नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Local Body Elections : १५ नगरपरिषद व १२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस !

भद्रावतीत धुमसतोय सत्तासंघर्ष : धानोरकर विरुद्ध धानोरकर..
भद्रावतीमध्ये परिस्थिती चांगलीच नाट्यमय झाली आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या गृहमतदारसंघात काँग्रेसला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच मिळत नव्हता. शेवटी त्यांनी स्वतःचे दीर अनिल धानोरकर यांच्या विरोधात नामोजवारांना नगर परिषदेच्या आखाड्यात उतरवून रातोरात संपूर्ण समीकरण पालटवले. नामोजवार हे भाजपचे शहराध्यक्ष होते, हंसराज अहीर यांचे ते खंदे समर्थक होते आणि भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र भाजपने अनिल धानोरकरांचे नाव फायनल करताच नामोजवार थेट काँग्रेसच्या गोटात दाखल झाले. ही चाल नेमकी त्या क्षणी खेळली गेली, जेव्हा भाजपला खात्री होती की उमेदवार ठरला आहे.

Local body election : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठे पक्षांतर; भाजपची रणनीती चर्चेत !

प्रतिभा धानोरकरांचा डाव..
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर भद्रावतीच्या राजकारणात प्रतिभा धानोरकरांचे वर्चस्व निर्विवाद आहे. विधानसभा निवडणुकीत अनिल धानोरकरांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली होती, पण प्रतिभा धानोरकरांनी त्यांना ती मिळू दिली नाही. त्यांनी स्वतःचा भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली आणि ती जागा शेवटी अपयशी ठरली. या पूर्वीच्या राजकीय तणावाची छाया आता नगरपरिषद निवडणुकीत अजून गडद झाली असून प्रतिभां धानोरकरांनी अनिल धानोरकरांच्या विरोधात नामोजवारांना उभे करणे, हे अहीर आणि अनिल धानोरकर गटासाठी मोठे आव्हान ठरले आहे.

Cabinet meeting : मुंबईत परवडणाऱ्या घरांना चालना, ‘ ‘आयकॉनिक’ शहरासाठी नवे धोरण!

अहीर गटाचे समीकरण कोलमडले..
भाजपमध्ये हंसराज अहीर यांची संघटनात्मक पकड भक्कम मानली जात असताना सलग दोन विश्वासू नेत्यांचे काँग्रेसकडे झुकणे हा अहीरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे प्रशांत समर्थ, आणि आता सुनील नामोजवार, दोन्ही बळकट नेत्यांनी भाजपची आगामी निवडणुकीची गणिते हादरवली आहेत. जिल्ह्यात या घडामोडींमुळे कमालीची खळबळ उडाली असून भद्रावतीची निवडणूक हंसराज अहीर आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील प्रतिष्ठेची लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे.