Uday Samantas suggestive answer is in news; Tensions, rumors and… : उदय सामंतांचे सूचक उत्तर चर्चेत; महायुतीतील तणाव, अफवा आणि…
Mumbai: राज्यात महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा, शिवसेना शिंदे गट मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर टाकलेला बहिष्कार, सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश देताना दिसत असलेली हालचाल या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रातील वरिष्ठ नेतृत्व यांच्यामधील घडामोडींवरून महायुतीतील तणाव अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. भाजपावर मित्रपक्षांना गिळंकृत करण्याचा आरोप पूर्वीपासून होत आलाय. अगोदर शिवसेना फुटली आणि आता शिंदे गटालाही तशीच वेळ येणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी दिलेले उत्तर सध्या राज्याच्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे.
Local body election : मिनी मंत्रालयाच्या निवडणुका पुढे ढकलणार?
वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत उदय सामंत यांना थेट विचारण्यात आले की भाजपाचा मित्रपक्षांबाबत विशिष्ट पॅटर्न असतो आणि हळूहळू त्यांना गिळंकृत केले जाते. यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा अनुभव राज्याने पाहिला, आता शिंदे गटाचीही अशीच अवस्था होणार का, असा प्रश्न विचारला असता सामंत यांनी म्हणाले की ही सर्व चर्चा कदाचित अफवा असू शकतात. मात्र या अफवा सत्यात उतरू नयेत याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही दक्षता भाजपाने घ्यावी का, असा पुढील प्रश्न विचारला असता सामंत यांनी सांगितले की शिवसेना शिंदे च्या बाबतीत आतापर्यंत असे काही घडलेले नाही, त्यामुळे या चर्चांना फारसा आधार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Gauri Palve : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नातेसंबंधांवरही भाष्य केले. दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपेक्षा पलीकडचे स्नेहसंबंध असून त्यांच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये कुणीही त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे वागू नये, असे त्यांनी सांगितले. महायुतीत भले वादविवाद आणि अफवा असतील, तरी नेतृत्वातील परस्पर विश्वास अबाधित असल्याचा दावा त्यांनी केला.
Nitin Gadkari : प्रगतीच्या साधनांसोबत समृद्ध विचारसरणीही तेवढीच आवश्यक !
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट तक्रार किंवा नाराजी व्यक्त करण्यासाठी होती का, असा प्रश्न विचारला असता उदय सामंत यांनी स्पष्ट केले की बिहारमध्ये नितीश कुमार यांची शपथविधी होत असताना राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद साधण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. एनडीएमध्ये नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून शिंदे यांना मान मिळतो आणि त्या भूमिकेनुसार ते दिल्लीतील नेतृत्वाची भेट घेणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीतील भूमिका, त्यातील ताणतणाव आणि भाजपाशी असलेल्या समीकरणांवरून निर्माण झालेल्या चर्चांमध्ये उदय सामंतांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण नव्या चर्चांनी गजबजले आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि त्यावर दिलेली ही सूचक स्पष्टीकरणे आगामी राजकारणाला कोणते वळण देतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
_______








