Breaking

Sports director of Wardha: मानधनात अनियमितता; ‘खेलो इंडिया’चा ‘खेला’!

A new coach will be appointed for ‘Khelo India’ : नव्या प्रशिक्षकाची होणार नियुक्ती; क्रीडा संचालकांच्या सूचना

Wardha खेलो इंडिया उपक्रमात प्रशिक्षकाला देण्यात येणाऱ्या मानधनात अनियमितता आढळून आल्याने यासंदर्भात विभागीय क्रीडा संचालकांकडून सोमवारी जिल्हा क्रीडा विभागाची झाडाझडती घेतली. यात कार्यमुक्त केलेल्या प्रशिक्षकाच्या ठिकाणी नव्याने प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, सहप्रशिक्षकाचे पद कमी करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा क्रीडा विभागाला संचालकांनी केल्या.

जिल्हा क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या प्रशिक्षकाला पाच महिन्यांपूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिले होते. असे असताना त्यांच्या नावे मानधन निघूनही त्यांना मिळत नव्हते. सोमवारी, १३ रोजी नागपूर क्रीडा विभागाचे संचालक जिल्हा क्रीडा विभागात धडकले. दुपारी २ वाजता प्रकरणाची सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत चालली. बॉक्सिंग केंद्रासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २०२१ मध्ये झालेल्या बैठकीत प्रशिक्षक, शुभम जुगनाके व सहायक प्रशिक्षक करण क्षीरसागर यांची अनुक्रमे १३ हजार, सात हजार रुपये मानधनावर २ वर्षांकरिता निवड करण्यात आली होती.

Vidarbha Farmers : मृदा परीक्षणाच्या प्रक्रियेची होतेय ‘माती’!

मानधनाची रक्कम साहस बहुउद्देशीय स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत देण्यात येत होती. ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. निधी उपलब्ध नसल्याने त्यांना त्यांचे मासिक मानधन देणे शक्य झाले नाही. ८ जानेवारी २०२५ला प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने मानधन अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

Nagpur Collectorate : शेतकऱ्यांना मिळणार ‘युनिक फार्मर आयडी’

उर्वरित ५ हजार रुपयेप्रमाणे शिल्लक रक्कम १४ ऑक्टोबर २०२४ रोजी क्रीडा संचालनालयास परत करण्यात आली असल्याचा अहवाल संचालकांना सादर केला आहे. केंद्रातील खेळाडूचे नुकसान न व्हावे, यासाठी नव्याने प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया समितीच्या मान्यतेने करण्यात येणार आहे, असे क्रीडा संचालकाला दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.