LIVE monitoring will take place in the strong room : नऊ अधिकाऱ्यांची विशेष तपासणी, मतमोजणी प्रक्रियेची पूर्ण तयारी
Buldhana नगर परिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ‘स्ट्रॉंग रुम’मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसर उच्च सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आला आहे. पारदर्शकतेचा नमुना म्हणून स्ट्रॉंग रुममधील सर्व हालचाली उमेदवारांना थेट पाहता याव्यात, यासाठी बाहेरील भागात LIVE डिस्प्लेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉंग रुमची नियमित पडताळणी करण्यासाठी नऊ अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील स्वतः बारकाईने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
२ डिसेंबरला पार पडलेल्या मतदानात बुलढाणा नगरपरिषदेसाठी व नगराध्यक्षपदासाठीच्या ७ जागांसह १२४ उमेदवार रिंगणात आहेत. काही मतदान केंद्रांवर बोगस मतदानाचा प्रयत्न आणि तणावाच्या घटना घडल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन कडक पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंग रुममध्ये हलविण्यात आली.
हाय सिक्युरिटी स्ट्रॉंग रुम — LIVE फीड उमेदवारांसाठी उपलब्ध
स्ट्रॉंग रुमभोवती मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला असून, सर्व हालचाली रेकॉर्ड करण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. कुणालाही शंका राहू नये म्हणून, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील प्रत्यक्ष चित्रफीत उमेदवारांना पाहता यावी यासाठी बाहेर डिस्प्ले स्क्रीन बसविण्यात आले आहेत. उमेदवारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था देखील केली आहे.
Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उठणार!
नऊ अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती
स्ट्रॉंग रुमच्या तपासणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह एकूण नऊ अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी आठ तासांच्या कालावधीत तीन वेळा प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील स्वतः वेळोवेळी स्ट्रॉंग रुम परिसराची पाहणी करून सुरक्षा बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत.
मतमोजणीपर्यंत कडक बंदोबस्त कायम
शहरातील ७६ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम —
बहुतांश केंद्रांवर २ बॅलेट युनिट + १ कंट्रोल युनिट
तर तीन प्रभागांतील सहा केंद्रांवर ३ बॅलेट युनिट + १ कंट्रोल युनिट
ही सर्व यंत्रे कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली असून २१ डिसेंबरच्या मतमोजणीपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.








