व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उठणार!

Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उठणार!

A rush among aspirants for candidature : उमेदवारीसाठी इच्छुकांची धडपड, पक्षांतर्गत स्पर्धेला उधाण

Chikhli नगरपालिका निवडणुकीचे वातावरण अजून स्थिरावले नसतानाच ग्रामीण राजकारणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागली आहे. चिखली तालुक्यातील ७ जि.प. गट आणि १४ पं.स. गण यासाठी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे अनेक कार्यकर्त्यांच्या राजकीय आशा पुन्हा धगधगू लागल्या आहेत.

नगरपालिका निवडणुकीचा अनुभव — संघर्ष, खर्च आणि कडवी स्पर्धा

अलीकडील नगरपालिका निवडणुकीत प्रचंड खर्च आणि उमेदवारीसाठी झालेल्या संघर्षामुळे सामान्य कार्यकर्त्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले. नेत्यांसाठी जीवाचे रान करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्वतःची उमेदवारी मिळवण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसले. आता हेच समीकरण जि.प.–पं.स. निवडणुकीतही पुन्हा दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Minister Aditi Tatkare accused of arbitrary functioning : बाल संगोपन योजना राबविताना बाहेरील जिल्ह्यांना प्राधान्य?

उमेदवारीचा पेच — प्रामाणिकपणा की सर्व्हे?

उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठी कोणते निकष लावणार?

प्रत्यक्ष क्षेत्रातील प्रामाणिक काम?

की फक्त पक्षीय सर्व्हेमधील नाव?

हा मोठा प्रश्न इच्छुकांसमोर आहे. सर्व्हेमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी अनेक उमेदवारांनी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी, सोशल मीडिया मोहीमा आणि शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. यामुळे प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतील की त्यांना संधी मिळेल, यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

‘आश्वासनांचा पाऊस’ परत येणार

निवडणुकांमध्ये आश्वासनांचा पाऊस पडणे अपरिहार्य. पण प्रत्यक्षात ग्रामीण विकासासाठी कोणताही ठोस अजेंडा नसलेल्या अनेक लोकप्रतिनिधींचा अनुभव जनतेसमोर आहे.
म्हणूनच, या निवडणुकीत मतदारांनी —

उमेदवाराचे मागील काम,

त्याची विकासाबाबतची स्पष्ट दृष्टी,

आणि जनतेमध्ये मिसळून समस्यांचे निराकरण करण्याची तयारी
यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक वर्तुळात व्यक्त होत आहे.

Mahavitaran : ‘दिवसा वीज द्या’, वन्यप्राण्यांच्या धोक्याने शेतकरी संतप्त

गावांमध्ये पाणी, रस्ते, स्वच्छता, शेतकऱ्यांच्या समस्या आजही कायम. ग्रामपंचायतींना अधिकार असले तरी अनेक सरपंच त्यांचा वापर करण्यात कमी पडतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या अपेक्षा आता जि.प.–पं.स. सदस्यांकडे वळल्या आहेत. या निवडणुकांमधून कोणते नेतृत्व पुढे येते, हे आगामी पाच वर्षांच्या विकासाचे दिशानिर्देश ठरवणार आहे.

नगरपालिकेचा निकाल बाकी असतानाच जि.प.–पं.स. निवडणुकांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी आता प्रामाणिक कार्य, जनाधार, सर्व्हेमधील स्थान, आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वास असा ‘चक्रव्यूह’ उमेदवारांसमोर उभा आहे.

error: Content is protected !!