Blow dealt to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) : महापालिका निवडणुकीआधी अकोल्यात मोठी राजकीय घडामोड
Akola आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख (अकोला पश्चिम) तथा माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी शुक्रवारी नागपूर येथील देवगिरी बंगला येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
पाच माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
शहरातील संघटनात्मक कार्यावर भक्कम पकड असलेले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील निष्ठावान नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राजेश मिश्रा यांच्यासह गजानन चव्हाण, अनिता मिश्रा, राजकुमारी मिश्रा आणि प्रमिला गीते या माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले. याचबरोबर उपजिल्हाप्रमुख (अकोला पश्चिम) तरुण बगेरे, युवासेना शहरप्रमुख नितीन मिश्रा तसेच उपशहरप्रमुख संजय अग्रवाल यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
Amravati Municipal Corporation : महापालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर
महानगर प्रमुखपदाची शक्यता चर्चेत
या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात राजेश मिश्रा यांना शिवसेना शिंदे गटाकडून महानगर प्रमुखपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सचिवाची प्रतिष्ठा पणाला
अकोल्यातील स्थानिक राजकारणात राजेश मिश्रा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, अंतर्गत संघटनात्मक कारणांमुळे हा निर्णय काही काळ रखडला होता. अखेर पाच माजी नगरसेवकांसह झालेल्या या प्रवेशामुळे अकोल्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी संघटनात्मक पोकळी निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.








