Landless launch agitation : भूमिहीनांचा एल्गार, खामगाव एसडीओ कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’

Protest held for demands from farm loan waiver to taluka creation : कर्जमुक्तीपासून तालुका निर्मितीपर्यंत मागण्यांचा भडिमार; शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Khamgao शेतकरी, कामगार, भूमिहीन व कष्टकऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ डिसेंबर रोजी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर भूमिहीन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला.

भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातून शेतकरी, कष्टकरी, बेघर नागरिक तसेच अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होत थेट एसडीओ कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी मागण्यांचे सविस्तर निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

Prahar Shikshak Sanghatna : विषय शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरा; प्रहार शिक्षक संघटनेचा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव

मोर्चाद्वारे शेतकरी व भूमिहीनांची शंभर टक्के कर्जमुक्ती, वन महसूल व गायरान जमिनींचे पट्टे देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच २०११ च्या शासन निर्णयान्वये १९९० पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी करण्यात आली. यासह गुंठेवारी, पांदण रस्ते, शेतरस्ते, पीकविमा, आर्थिक मदत व नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी पुढे रेटण्यात आली.

रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाढवून २.५ लाख रुपये करण्याची, ग्रामीण व शहरी भागातील निवासी अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत पट्टे वाटप करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १९१ प्रकल्पांना स्थगिती, खामगाव जिल्हा तसेच लाखनवाडा व उदयनगर स्वतंत्र तालुका निर्मिती, भूमिहीन कामगारांच्या अपघाती मृत्यूस दोन लाख रुपयांचा विमा देण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली.

BJP Akola : पक्षविरोधी कारवायांना भाजपची चपराक; बंडखोरांना माफी नाही

या आक्रोश मोर्चामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला असून, आता शासन या मागण्यांवर नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.