Local Body Elections : देऊळगाव राजा नगरपालिकेत ‘अर्थकारण’ आघाडीवर!

Fate of 21 corporators to be decided by 29,326 voters : प्रचारात उत्साह ओसरला; गुंतागुंतीच्या समीकरणांत २० डिसेंबरला मतदान

Deulgao raja नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून, येत्या शनिवारी (दि. २०) नगराध्यक्षपदासह दहा प्रभागांतील २१ नगरसेवकांचे भवितव्य २९ हजार ३२६ मतदार ठरवणार आहेत. ऐनवेळी निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवारांसह त्यांच्या प्रचार यंत्रणांची गती मंदावली असून, प्रचार सुरू असला तरी पूर्वीचा उत्साह आणि धार कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक प्रक्रिया लांबल्याने मतदारांशी पुन्हा संपर्क साधावा लागत असून, त्यामुळे प्रचार खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘अर्थकारण’ निर्णायक ठरत असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

अर्थकारणाचा वाढता प्रभाव?
विविध प्रभागांमध्ये पैशांच्या तसेच वस्तूंच्या स्वरूपातील प्रलोभनांच्या चर्चा सुरू असून, त्यामुळे सुज्ञ मतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच, काही ठिकाणी मतदार अशा प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत आहे.

Primary Health Centre : धक्कादायक! वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाळली औषधे

उमेदवारांची गर्दी; समीकरणे गुंतागुंतीची
देऊळगाव राजा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार, तर दहा प्रभागांतील २१ जागांसाठी तब्बल ७७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आघाड्या अस्तित्वात असल्या तरी अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार स्वतंत्रपणे प्रचार करत असल्याचे चित्र आहे. परिणामी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रत्येक प्रभागात समन्वय साधण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल केलेल्या काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरणही दिसून येत आहे.

Mehkar Taluka : मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार

निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शहरात स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असली तरी प्रत्यक्षात प्रभावी कारवाई दिसून येत नसल्याने निवडणूक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाकडून मोठा खर्च होत असताना बेकायदेशीर अर्थकारण रोखण्यात यंत्रणा कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी प्रभागरचना; आकडेमोडीत दमछाक
यंदाची नवी प्रभागरचना उमेदवारांसाठी आव्हान ठरत आहे. दहा प्रभागांत एकूण ३० मतदान केंद्रे असून, पुरुष मतदार १४,८५४, महिला मतदार १४,४०६ आणि एकूण मतदारसंख्या २९,३२६ आहे. नव्या रचनेनुसार मतदारांची आकडेमोड जुळवताना अनेक उमेदवारांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!

सिंदखेडराजा मतदारसंघातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा या निकालावर ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.