Urban–rural survey finds 84,075 single women in the district : सर्वांगीण पुनर्वसनासाठी उपाययोजना, शहरी व ग्रामीण दोन्ही भागात सर्वेक्षण
Buldhana बुलढाणा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकल महिलांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण ८४ हजार ७५ एकल महिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७२ हजार ७३९, तर नगरपालिका नागरी क्षेत्रात ११ हजार ३३६ एकल महिला आहेत.
या एकल महिलांमध्ये विधवा महिलांची संख्या सर्वाधिक असून ७२ हजार १९ महिला विधवा आहेत. तसेच ३ हजार ६२३ परित्यक्ता असून उर्वरित महिलांमध्ये घटस्फोटीत तसेच जास्त वयाच्या अविवाहित महिलांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात सर्वेक्षण केल्याने जिल्हास्तरावर अचूक आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकल महिलांच्या समस्यांवर नेमकी व प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
राजमाता जिजाऊ यांचा बुलढाणा हा जिल्हा असून, एकल महिला म्हणून त्यांनी दाखवलेले कर्तृत्व आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळे माँ साहेब जिजाऊ यांच्या जिल्ह्यात एकल महिलांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवणे औचित्यपूर्ण ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
Municipal Corporation Elections : काँग्रेस–वंचित आघाडीची निव्वळ चर्चा, बंडखोरीचे सावट कायम
तालुकानिहाय एकल महिलांची संख्या
ग्रामीण भागात सर्वाधिक एकल महिला चिखली (८,९४६), बुलढाणा (८,८९०) आणि मेहकर (८,४६८) तालुक्यात आहेत. नागरी भागात मलकापूर (२,२०४), बुलढाणा शहर (१,६६७) आणि खामगाव शहर (१,६६५) येथे संख्या अधिक आहे.
इतर तालुक्यांतील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे – देऊळगाव राजा (२,७५५ व ६४३), जळगाव जामोद (४,२४१ व २५९), खामगाव (६,७६० व १,६६५), लोणार (४,४७६ व ३४१), मलकापूर (४,७८६ व २,२०४), मेहकर (८,४६८ व १,०८०), मोताळा (६,३३७), नांदुरा (४,७६७ व ६४७), संग्रामपूर (४,००८ व २५७), शेगाव (२,६६९ व १,०३३) आणि सिंदखेड राजा (५,६३६ व ४९१).
BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीआधी शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत !
या एकल महिलांचे वयानुसार वर्गीकरण करण्यात येणार असून, त्यांना गावपातळीवर आवश्यक सर्व दाखले व कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच १८ वर्षांखालील मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल.
एकल महिलांचे आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे असल्याने *‘उमेद’*च्या माध्यमातून त्यांचे व्यवसाय सुरू केले जातील, व्यवसाय प्रेरणा कार्यशाळा घेण्यात येतील आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. त्यांचे वारसा हक्क मिळवून देण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.








