Sunil kedar : विधानसभेत पत्नी पराभूत, आता 4 पैकी 3 नगरपरिषदा गमावल्या

Congress lost 3 out of 4 municipal councils in saoner : काँग्रेसच्या सुनील केदारांना धक्क्यावर धक्के, सावनेरमधील अस्तित्व धोक्यात

Nagpur काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदारांना धक्क्यावर धक्के बसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सावनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या. आता त्यांनी सावनेरमधील चार पैकी तीन परिषदा गमवल्या आहेत. एवढेच नव्हे तर केदारांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून नगराध्यक्षपदासाठी निवडलेले सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यांचे नेतृत्व व निर्णयावरही शंका घेतली जात असून ही केदारांसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

केदार सावनेर विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने दोषी ठरवल्याने निवडणूक लढता आली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यांचा भाजपचे आशिष देशमुख यांनी पराभव केला. लोकसभेच्या निवडणुकीत मात्र केदारांनी एकहाती काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणले होते. त्यामुळे त्यांचे पक्षात चांगलेच वजन वाढले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर केदारांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले होते. मात्र अति धाडस करणे त्यांच्या अंगलट आहे.

Municipal council results : खडसे ते गुलाबराव, पटेल ते बोरनारे… दिग्गजांना गावगाड्यात धक्का

सावनेर विधानसभा मतदारसंघातर्गत येणाऱ्या सावनेर, कळमेश्वर, खापा आणि मोहपा या चार नगरपरिषदेपैकी काँग्रेसला फक्त मोहपा येथे विजय मिळाला आहे. येथून काँग्रेसचे माधव चर्जन निवडून आले आहेत. सावनेर हा केदारांचा गड मानला जात होता. मात्र सावनेर नगर परिषदेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजय मंगळे, खापा नगर परिषदेतून पियुष बोरडे आणि कळमेश्वरमधून भाजपचे अविनाश माकोडे विजयी झाले आहेत.

नगर पालिका आणि नगर परिषद घोषित झाल्यानंतर केदारांचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्विन बैस यांनी परस्पर मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या मुलाखतीच्या बैठकीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना नियुक्त केलेल्या निवड मंडळाला बोलावण्यात आले नव्हते. याची तक्रार अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली होती. त्यानंतर निवडणूक निरीक्षक यांना तातडीने नागपूरला पाठवण्यात आले होती.

 

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार मंत्रीपदी असते तर चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे चित्र वेगळे दिसले असते!

त्यांनी हा मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही केदारांनी मुलाखती घेऊन थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिले होते. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्षांनी केदारांच्या उपस्थित झालेल्या मुलाखती आणि बैठक अवैध ठरवली तसेच नव्याने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सांगितले होते. मात्र दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या मुलाखतीला केदारांच्या समर्थकांनी दांडी मारली होती.

सरतेशेवटी जिल्ह्याचे नेतृत्व व उमेदवारांची निवड केदारांच्याच हाती सोपवण्यात आली होती. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या मर्जीचे उमेदवार टाकले. वाडी नगर परिषदेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला तर बुटीबोरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला केदारांनी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांचे सर्व प्रयोग फसले. त्यांनी दिलेले मोहपा नगर परिषदेचा उमेदवार वगळता सर्वच पराभूत झाले आहेत.