27 gram panchayats to have direct sarpanch elections : संग्रामपूर तालुक्यात गावागावात राजकीय हालचालींना वेग
Sangrampur तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या राजकीय सूत्रानुसार थेट सरपंच निवडीचा निर्णय लागू झाल्याने, संबंधित गावांमध्ये आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे.
थेट सरपंचपदाची निवडणूक ही सरपंच केंद्रित असणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी ग्रामस्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवार, कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय गटांमध्ये हालचाली वाढल्या असून, निवडणूक वातावरण तयार होऊ लागले आहे.
Shock to Jorgewar : आमदार जोरगेवारांना धक्का ; चंद्रपूर निवडणूक प्रमुख पदावरून हटवले
तालुक्यातील पुढील २७ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. यामध्ये
आवार, कोद्री, उकळी, वरवट खंडेराव, पातुर्डा बु., वरवट बकाल, बोडखा, वानखेड, दुर्गादैत्य, कवठळ, खिरोडा, सोनाळा, सगोडा, पळसोडा, काकनवाडा खुर्द, पिप्री, आडगाव, अकोली, चांगेफळ, रुधाणा, निरोड, तामगाव, पळशी, झाशी, बावनबीर, टुनकी, लाडनापूर, वसाडी व आलेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या सर्व ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण सहा महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, वार्डनिहाय आरक्षण जाहीर होण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आरक्षण जाहीर होताच निवडणूक तयारीला अधिक वेग येणार असल्याचे संकेत आहेत.
या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकसंख्येने मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका विशेष गाजण्याची शक्यता आहे. यामध्ये सोनाळा, वानखेड, वरवट बकाल आणि पातुर्डा या ग्रामपंचायतींचा समावेश असून, येथे सरपंचपदासाठी ग्रामस्तरावर आतापासूनच जोरदार राजकीय तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
Municipal election : अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसाठी धोक्याचा इशारा!
ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाकडून मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत तालुक्यातील राजकारण अधिक तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








