Suspended Leaders Reinducted into BJP; Setback for Thackeray Faction of Shivsena : अकोल्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी, गिरीश गोखले यांचे निलंबन रद्द
Akola महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अकोल्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कृत्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले माजी नगरसेवक प्रतुल हातवळणे आणि माजी नगरसेवक गिरीश गोखले यांचे निलंबन रद्द करत भाजपने त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला. यासोबतच शिवसेना ठाकरे गटालाही भाजपने मोठा धक्का दिला.
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मंजुषा शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधून उमेदवारीही दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी झालेल्या या प्रवेशामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
Kirit Somaia : कट्टर शत्रू असलेल्या किरीट सोमय्या यांच्या मुलाविरुद्ध ठाकरेंना एक उमेदवार मिळेना
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने नाराज गटालाही जवळ करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे हरीश आलिमचंदानी यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक १५ मधून उमेदवारी दिली आहे. नाराज गटातील आणखी दोघांनीही आज भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षनेतृत्वावर टीका केल्याने हातवळणे आणि गोखले यांना पक्षविरोधी कृत्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज गटामार्फत तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू होती. या प्रक्रियेत आलिमचंदानी यांच्यासह गोखले यांचाही सहभाग होता.
Amravati Municipal Corporation Election : उमेदवारी अर्जाच्या वैद्यतेवरून 13 तास रंगले नाट्य
भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने नाराज गटाशी संवाद साधत त्यांच्या पुनर्प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार निलंबन रद्द करून अधिकृतपणे पक्षात पुनर्प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, जुन्या शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मंजुषा शेळके यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांच्या पती स्व. संजय शेळके यांनी पूर्वी भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.








