Amit Deshmukh appeal not to close Latur : अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
Latur : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांसह लातूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ लातूरमधील विविध सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी आज 7 जानेवारी रोजी लातूर बंदचे आवाहन केले होते. मात्र या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लातूर बंद न करण्याचे आवाहन करत वेगळी भूमिका मांडली आहे.
भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, असे स्पष्ट मत व्यक्त करत अमित देशमुख यांनी सांगितले की, आपण लोकशाही मार्गानेच या वक्तव्याला योग्य उत्तर देऊ. त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत हे विधान अत्यंत दुर्दैवी आणि लातूरकरांच्या भावना दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. लातूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांतून या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात असून, लातूरकरांचा स्वाभिमान यामुळे दुखावला गेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
लातूर बंदची हाक दिल्याचे समजल्याचे सांगत अमित देशमुख यांनी मात्र या मार्गाने निषेध व्यक्त करू नये, असे आवाहन केले आहे. भाजपच्या चुकीसाठी सर्वसामान्य लातूरकर, व्यापारी, विद्यार्थी आणि कामगारांना त्रास सहन करावा लागू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या विचारांवर ठाम राहून आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे, असे सांगत त्यांनी शांत, सुसंस्कृत आणि लोकशाही मार्गानेच उत्तर देण्याचा सल्ला दिला आहे.
Bmc election : ठाकरे बंधूंच्या एकत्रित मुलाखतीचा टीझर प्रदर्शित!
भविष्यात कोणीही स्व. विलासराव देशमुख किंवा लातूरकरांचा अपमान करण्याचे धाडस करणार नाही, असे ठामपणे सांगण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा विश्वासही अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. हे आवाहन आपण लातूरकरांच्या हितासाठी करत असल्याचे सांगत त्यांनी सर्व नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
__








