Penalty for contractor who starves students at Hingna IT squar : समाज कल्याण विभागाची कारवाई
Nagpur हिंगणा आयटी चौक परिसरातील राजनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी अनियमित आणि निकृष्ट प्रतिचा भोजनपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला समाजकल्याण विभागाने ५० हजारांचा दंड ठोठावला. तसेच विद्यार्थ्यांना नियमित भोजनपुरवठा करा, असे निर्देशही देण्यात आले.
ब्रिक्स कैलाश फूड या कंपनीला राज्यभरातील वसतिगृहाला भोजन पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार नियमित आहार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दूध, दही, कॉर्न फ्लेक्स असा पोषक आहार मिळावा, असेही करारात नमूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना आहार मिळत नसल्याची तक्रार समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली.
Pair of bulls in Shankarpat : जिल्ह्यातून ‘केसरी-मन्या’, तालुक्यातून ‘चिमणा-जगवार’ प्रथम
१२५ विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी उपाशी आहेत. सुमारे ६० विद्यार्थ्यांसाठी भोजन आले. मात्र तेही निकृष्ट प्रतीचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भोजन मिळत नसल्याने आम्ही किती दिवस उपाशी राहायचे. असा संतप्त सवाल वसतिगृहातील विद्यार्थी आदित्य हुमने, अभिषेक रामटेके, अंकुर रामटेके, सुमित मेश्राम, साहील राऊत यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना पूर्ण भोजन देणे हे कंत्राटदाराचे काम आहे. विद्यार्थ्यांना भोजन मिळते, मात्र त्यात गुणवत्ता नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दंड ठोठावण्यात आल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
Pratap Sarnaik : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार ‘लालपरी’ खरेदी करणार!
दोन दिवस उपाशी ठेवले होते
कंत्राटदाराकडून विद्यार्थ्यांना अनियमित भोजनपुरवठा करण्याचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वीही असे घडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील मुलांना दोन दिवसांपासून उपाशी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गेल्यावर्षी घडला होता. शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणारा नियमित आहारही मिळत नसल्याची तक्रार करत विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. या कंपनीला एक लाखाचा दंड करण्यात आला होता, अशी माहिती त्यावेळी समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली होती.