Ajit Pawar death news : नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या सभा ठरल्या अखेरच्या

Municipal election campaign meetings turn out to be the last : अजितदादांची ‘प्रचारतोफ’ बुलढाण्यासाठी ठरणार फक्त आठवण

Buldhana दोन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रचारतोफ बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड ताकदीने धडाडली होती. एकाच दिवशी चार-चार सभा घेत अजितदादांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले होते. मात्र, नियतीने वेगळाच खेळ खेळला आणि जिल्ह्यात झालेल्या या प्रचारसभा त्यांच्या अखेरच्या ठरल्या.

नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने अजितदादांनी दिलेल्या भेटी, केलेले रोखठोक भाषण आणि विकासाची ठाम मांडणी आज जिल्हावासीयांच्या स्मरणात ठळकपणे कोरली गेली आहे. “अजितदादांनी जिल्ह्यासाठी जे योगदान दिले, ते कायम स्मरणात राहील,” अशा भावना त्यांच्या निधनानंतर सर्वत्र व्यक्त होत आहेत.

Ajit Pawar death news : ‘दादा मध्यरात्रीही फोन करायचे…’; राजेंद्र शिंगणेंकडून आठवणींना उजाळा

बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजितदादा पवार काळाच्या पडद्याआड गेल्याची दुःखद वार्ता समजताच बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक बुलंद, आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेतृत्व हरपल्याची भावना कार्यकर्ते व नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

अजितदादांच्या जाण्याने त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून आज प्रत्येकाच्या मुखी अजितदादांचेच नाव आहे. प्रचाराच्या मैदानात घुमणारी त्यांची वाणी जरी आज शांत झाली असली, तरी बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या सभा आणि कार्याची छाप मात्र कायम राहणार आहे.