Shikshak Bank : निविदा न काढताच शिक्षक बँकेकडून कोट्यवधींची साहित्य खरेदी

Materials worth crores purchased without floating tenders : कलम ८८ अंतर्गत कारवाई; बोगस कर्जवाटप व आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप

Amravati अचलपूर येथील शिक्षक बँकेत येत्या काळात मोठा स्फोटक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता दक्ष सभासदांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६० च्या कलम ८८ अन्वये कारवाई सुरू केल्याने बँकेतील कथित गैरव्यवहारांवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

शिक्षक बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत संचालक मंडळ बरखास्त करावे व गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी माजी संचालक प्रभाकर झोड यांनी मार्च २०२५ मध्ये आमरण उपोषण केले होते. या उपोषणाचे फलित म्हणूनच कलम ८८ अंतर्गत कारवाई सुरू झाली असून, झोड यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा मिळाल्याचे चित्र आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे बोगस कर्जवाटप. बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत यांच्यासह १६ संचालक या कथित घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील १५ शाखांमध्ये सभासदांनी बँकेकडे पाठ फिरविल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी कर्जासाठी गर्दी असणाऱ्या बँकेचे काउंटर आता ओस पडले आहेत.

BJP OBC front : एसटी आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर; भाजपविरोधात निवडणुकीचा इशारा

यामुळे अन्य जिल्ह्यांत नव्या शाखा सुरू करून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी व कर्जवाटप करण्यात आल्याचा आरोप आहे. यवतमाळ शाखेत सन २०२३-२४ मध्ये दीर्घ व मध्यम मुदतीचे तब्बल ४२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. मात्र हे कर्जवाटप करताना संबंधित सभासद इतर बँकांचे थकीत आहेत का, याची खातरजमा करण्यात आली नाही. तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार आवश्यक असलेली सिबिल तपासणी न करता कर्जे मंजूर करण्यात आली.

Chandrapur Municipal Corporation Power Struggle : वडेट्टीवार-धानोरकर वाद दिल्ली दरबारी; ‘उद्याच्या बैठकीनंतर सगळं संपेल!’

बँक कोणतीही पडताळणी न करता कर्ज देत असल्याचे लक्षात येताच आधीच थकीत असलेल्या कर्जदारांनी याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. मुदतीत कर्जफेड न झाल्याने एनपीएचे प्रमाण वाढले. ही बाब लपवण्यासाठी बँकेने थकीत सभासदांचे कर्ज पुनर्गठन व नूतनीकरण केल्याचे चाचणी अंकेक्षणात उघड झाले आहे. अकोला व वाशिम शाखांमध्येही अशीच स्थिती असल्याचे समोर आले आहे.