parliament-budget-session-thanks-motion-passed-without-pm-speech-opposition-agitation : पंतप्रधानांच्या भाषणाविना लोकसभेत आभार प्रस्ताव मंजूर
New Delhi : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी संसदेतील वातावरण प्रचंड तणावपूर्ण राहिले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव गदारोळातच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे 2004 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविना हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामुळे संसदीय राजकारणात मोठी चर्चा रंगली असून विरोधकांनी भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.
लोकसभा सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभागृहातील गोंधळामुळे अवघ्या 65 सेकंदातच कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी पुन्हा कामकाज सुरू झाले असले तरी पाच मिनिटांतच पुन्हा गोंधळ उडाल्याने सभागृह दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. या गदारोळातच लोकसभेत पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Mayoral election : काँग्रेसचा लातूरचा गड कायम कारभाऱ्यांची बिनविरोध निवड
दरम्यान, राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू न दिल्याचा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून राहुल गांधी नियमांचे पालन करत नाहीत आणि याबाबत सभापतींनी त्यांना स्पष्ट सूचना द्यायला हव्या होत्या. यावर राज्यसभेतील सत्ताधारी नेते जे. पी. नड्डा यांनी लोकसभेचे मुद्दे राज्यसभेत मांडता येत नाहीत, असे सांगत काँग्रेसवर टीका केली. त्यांनी काँग्रेस पक्षाला “अबोध बालकाप्रमाणे वागू नका” असा टोला लगावला. या वादानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी सरकारवर टीका करताना राहुल गांधींना बोलू देण्याची मागणी केली. त्यांनी सरकारला कशाची भीती वाटते, असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधी एखाद्या पुस्तकातील सत्य उद्धृत करतील, की शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या व्यापार करारावर प्रश्न उपस्थित करतील, याची सरकारला भीती वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Anjali Damania, Parth Pawar : पार्थ पवारांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’ला अंजली दमानियांचे आव्हान
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिले. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधी यांनी दावा केला की, चिनी टँक कैलास रिजपर्यंत पोहोचले असताना लष्कराला स्पष्ट आदेश देण्यात आले नाहीत. पंतप्रधानांनी ‘जे योग्य वाटेल ते करा’ असे सांगून जबाबदारी झटकली आणि लष्करप्रमुखांना एकटे पाडले, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान लोकसभेत येण्याचे धैर्य दाखवणार नाहीत, कारण जर ते आले तर मी स्वतः जाऊन त्यांच्या हातात हे पुस्तक देईन, जेणेकरून ते वाचून देशाला सत्य समजेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेतला राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र लोकसभेत त्यांच्या उत्तराशिवाय आभार प्रस्ताव मंजूर झाल्याने विरोधकांनी याला सरकारसाठी मोठा नैतिक धक्का मानला असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे असल्याचे व्यक्त केले जात आहे.
___








