व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Anniversary program : टीकेनंतर पुणे महापालिकेचा निर्णय अखेर मागे

Anniversary program : टीकेनंतर पुणे महापालिकेचा निर्णय अखेर मागे

pune-municipal-corporation-anniversary-program-cancelled-marathi : मुरलीधर मोहोळांच्या सूचनेनंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द

Pune : महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर अखेर पडदा पडला आहे. शोककाळाच्या पार्श्वभूमीवर नाच-गाण्याचे कार्यक्रम आयोजित केल्याने महापालिका प्रशासनावर सर्व स्तरातून तीव्र टीका होत होती. या वादानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली. त्यानंतर महापालिकेने आपला आधीचा निर्णय मागे घेत कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील सध्याच्या संवेदनशील वातावरणात पुणे महापालिकेने 15 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नृत्य, नाटक, ऑर्केस्ट्रा, वादन तसेच छायाचित्र आणि चित्रकलेचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. यासाठी कर्मचाऱ्यांकडून सहभागासाठी नावे मागवण्यात आली होती.

Weather Alert : महाराष्ट्रात तापमानात चढउतार, काही भागात पावसाचा इशारा

मात्र शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम कितपत योग्य आहेत, असा सवाल उपस्थित होताच महापालिकेच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेला कार्यक्रम रद्द करण्याची स्पष्ट सूचना केली.

Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व डॉ. झिशान हुसेन यांच्याकडे; गटनेतेपदासाठी प्रदेशाध्यक्षांची मोहोर

मोहोळ यांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत वर्धापन दिनानिमित्त नियोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाकडून याबाबतची माहिती अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे काही काळ चर्चेत राहिलेला हा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा संवेदनशील प्रसंगांमध्ये अधिक जबाबदारीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

_

error: Content is protected !!