Amravati Municipal Corporation : एक निर्णय चुकला; एमआयएमचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी अडचणीत

AIMIM district president and district in-charge land in trouble : व्हीपच काढला नाही, मग नगरसेविकेवर कारवाई कशी?, रवी राणा म्हणतात, ती आमचीच नगरसेविका

Amravati महापालिकेत शुक्रवारी झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवली. महायुतीच्या महापौर व उपमहापौरांना ५५ मते मिळाली. त्यांच्याकडे ४४ नगरसेवकांचे थेट संख्याबळ असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सहकार्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान आणि शिवसेना (शिंदे गट) सत्तेत राहू शकले.

या निवडणुकीदरम्यान एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी महायुतीला मतदान केले. पक्षादेश झुगारून मतदान केल्याने सभागृहात तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मीरा कांबळे यांच्या एका मतामुळे एमआयएमचे अमरावती जिल्हाध्यक्ष हाजी इरफान तसेच जिल्हा पक्षप्रभारी व राज्य उपाध्यक्ष युसूफ पुंजानी हे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोषी आढळल्यास कारवाईचा इशाराही माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Nagpur Shivsena UBT new executive committee : उद्धव सेनेत खांदेपालट; किशोर कुमेरियांवर शहराची धुरा, बंडखोरांना घरचा रस्ता!

एमआयएमच्या नगरसेवकांनी अमरावती महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सर्वानुमते झाल्याची माहिती सदस्यांना देण्यात आली होती. मात्र, त्या अनुषंगाने पक्षातील जबाबदार नेत्यांनी गटनेत्यांना व्हीप काढण्याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. व्हीप काढण्यात न आल्याकडे जिल्हाध्यक्ष व पक्षप्रभारी यांनीही दुर्लक्ष केले.

व्हीप जारी न झाल्यामुळे आता संबंधित नगरसेविकेवर पक्षीय पातळीवर करण्यात येणाऱ्या कारवाईखेरीज अन्य कोणतीही कारवाई शक्य नाही. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत, ‘व्हीप का काढण्यात आला नाही?’ याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. समाधानकारक खुलासा न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

या नाट्यमय घडामोडींमागे आमदार रवी राणा यांची भूमिका असल्याचे आता समोर येत आहे. एमआयएमकडून व्हीप काढण्यात न आल्याची माहिती मिळताच त्यांनी बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजप व युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना मतदान करण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis : कागदावरचे नव्हे, जमिनीवरचे करार!; फडणविसांचा विरोधकांना टोला

संबंधित नगरसेविकेचा मुलगा युवा स्वाभिमान पक्षाचा पदाधिकारी आहे. आरक्षणाच्या गणितामुळे त्याला उमेदवारी देता न आल्याने त्याने आपल्या आईसाठी एमआयएमकडून तिकीट मिळवून दिले आणि त्या निवडूनही आल्या. आता या नगरसेविकेच्या पाठीशी आमदार रवी राणा उभे असून, माध्यमांशी बोलताना त्यांनी तसे संकेतही दिले आहेत.