व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Paranjape Vs Kadam : सुनील तटकरे यांच्याबाबत अभद्र टिप्पणी थांबवा, अन्यथा…

Paranjape Vs Kadam : सुनील तटकरे यांच्याबाबत अभद्र टिप्पणी थांबवा, अन्यथा…

sunil-tatkare-abadr-ttippani-anand-paranjape-warns-ramdas-kadam : आनंद परांजपेंचा रामदास कदमांना कडक इशारा

Thane : शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या अभद्र टिप्पण्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रामदास कदम यांना थेट इशारा दिला आहे. ठाणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, सुनील तटकरे यांच्याबाबत केली जाणारी भाषा तात्काळ थांबवावी, अन्यथा आम्हीही त्याच भाषेत उत्तर देण्यास समर्थ आहोत.

आनंद परांजपे यांनी सांगितले की, सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत निर्णय होता. मात्र, या निर्णयाच्या अनुषंगाने रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र वक्तव्ये केली, ती अत्यंत आक्षेपार्ह आहेत. आम्हाला अनिल परब यांनी विधिमंडळात तुमच्यावर केलेले आरोप आणि तुमच्या कुटुंबाशी संबंधित डान्सबार प्रकरणांबाबत बोलायला लावू नका, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

ZP election : हॉटेल परिसरात आढळल्या सीलबंद ईव्हीएम, राष्ट्रवादी उमेदवाराचा गंभीर आरोप !

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच युतीधर्म पाळल्याचे सांगत आनंद परांजपे म्हणाले की, सुनील तटकरे यांनीही युतीच्या मर्यादा आणि शिस्त पाळली आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी कोणतीही बेजबाबदार किंवा अभद्र टिप्पणी करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

राजकीय भूमिकेबाबत बोलताना आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची एनडीएमध्ये सहभागी होण्याची भूमिका ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली होती. त्यामुळे ज्यांना विलिनीकरणाची घाई लागली आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, तसेच जितेंद्र आव्हाड यांनी कोणती भूमिका घ्यावी याचा निर्णय शरद पवार गट घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आत्मघाती हल्ल्याची शक्यता?

या वेळी बोलताना आनंद परांजपे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही अद्याप या दुःखातून सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेच्या संदर्भात योग्य वेळी पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असेही त्यांनी नमूद केले.

Mohan Bhagwat : ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही!

अजितदादा पवार यांच्या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले असून, या चौकशीची संपूर्ण माहिती महाराष्ट्रासमोर येणे आवश्यक असल्याचे आनंद परांजपे म्हणाले. खासदार बजरंग सोनावणे यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घ्यावी, असे सांगत जबाबदार व्यक्तींनी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत चौकशी सुरू असल्याची आठवण करून देत त्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!