Harshwardhan Sapkal : शिवरायांशी तुलना करणाऱ्या सपकाळांविरोधात भाजपचा ‘एल्गार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निषेध

bjp-protest-against-harshvardhan-sapkal-tipu-sultan-controversy-akola : अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांचे जोडे मारो आंदोलन; सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी

Akola छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतानची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने अकोल्यात रणशिंग फुंकले आहे. सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून, भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सपकाळ आणि काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध नोंदवला.

या आंदोलनाचे नेतृत्व खासदार अनुप धोत्रे आणि भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी केले. यावेळी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणत्याही आक्रमकाशी करणे हे ऐतिहासिक पाप आहे. सपकाळांनी केवळ शिवरायांचाच नव्हे, तर तमाम शिवप्रेमींचा अपमान केला आहे,” अशा शब्दांत भाजप नेत्यांनी आपला रोष व्यक्त केला.

Sanjay Gaikwad : शिंदेसेनेत पक्षप्रवेशांचा जोर; निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह

भाजप नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, सपकाळ यांचे वक्तव्य अक्षम्य आहे. “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहून टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणे ही काँग्रेसची विकृत मानसिकतेची लक्षणे आहेत. सपकाळ यांनी तात्काळ महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र केले जाईल,” असा इशारा माजी जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील आणि नगरसेवक पवन महल्ले यांनी दिला. या आंदोलनात माजी उपमहापौर वैशाली शेळके यांच्यासह भाजपचे सर्व आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Warning to Thackeray brothers : ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर चित्र वेगळे असते’

एकूणच हे वातावरण तापलेले असतानाच मालेगाव महापालिकेच्या उपाध्यक्षांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेचे पडसादही अकोल्यातील आंदोलनात उमटले. “काँग्रेस जाणीवपूर्वक टिपू सुलतानच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा घणाघात भाजप नेत्यांनी केला. या प्रकरणाचा प्रशासनाने अहवाल मागवला असला तरी, भाजप आता हा मुद्दा थेट जनतेच्या न्यायालयात घेऊन जाण्याच्या तयारीत आहे.