Akola Municipal Corporation standing comittee : स्थायी समितीत शहर सुधार विकास आघाडीचे नऊ, काँग्रेसचे चार सदस्य

16 members elected in the very first general body meeting : पहिल्याच सर्वसाधारण सभेत १६ सदस्यांची निवड; वादळी चर्चेनंतर सभागृहाची मान्यता

Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीत भाजपप्रणीत शहर सुधार विकास आघाडीचे नऊ सदस्य निवडून आले असून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.

महापौर शारदा खेडेकर आणि मनपा आयुक्त सुनील लहाने यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य निवडीचा विषय सर्वप्रथम चर्चेला घेण्यात आला. स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीवर सभागृहात काही काळ वादळी चर्चा झाली. मात्र, चर्चेनंतर अखेर स्थायी समिती सदस्यांची यादी सभागृहासमोर मांडण्यात आली आणि सभागृहाने तिला मंजुरी दिली.

Sudhir Mungantiwar : विरोधी गटाच्या नेत्याचा फोन अन् मुनगंटीवारांनी अयोध्येतून फिरवले चक्र; पोलीस भरतीतील तांत्रिक अन्याय रोखण्याचे निर्देश

शहर सुधार विकास आघाडीकडून माजी महापौर विजय अग्रवाल, हरीश अलीम चंदाने, सिद्धार्थ उपरवट, योगिता पावसाळे, शरद तुरकर, मंजुषा शेळके, विनोद मापारी, नर्गिस परवीन, फैयाज खान आणि पल्लवी मोरे यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाकडून सुवर्णा जाधव, आझाद खान, आलियार खान, मोहम्मद फजलू अब्दुल करीम, शाहीन अंजुम मेहबूब शेख यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सागर भाऊ कातर, वंचित बहुजन आघाडीतर्फे निलेश देव, तर एमआयएमकडून सय्यद रहीम सय्यद हशम यांची निवड करण्यात आली आहे.

Sarpanch on protest : ‘मिनी मंत्रालयाला’ कुलूप! २० फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती ठप्प; सरपंचांचे आरपारच्या लढाईचे रणशिंग

नियुक्त करण्यात आलेल्या या १६ सदस्यांमधून स्थायी समितीचे सभापती कोण असतील, याची निवड स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या पहिल्या सभेकडे लागले असून, सभापतीपदासाठी कोणत्या पक्षाला संधी मिळते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.