Vijay Wadettiwar : अजित पवारांच्या विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ खराब? विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘दाल मे कुछ काला है!’

विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय पेच; ब्लॅक बॉक्स जळाल्याने घातपाताच्या संशयाला बळ : ajit-pawar-plane-crash-black-box-damaged-vijay-Wadettiwar-reaction

Nagpur अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून, या अपघातावर सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनीही वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून काहीतरी गडबड असल्याचा तर्क लावला आहे. आता या विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याची माहिती समोर आली आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी “दाल मे कुछ काला है” अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने घातपाताच्या चर्चेला आणखीच खतपाणी घातले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वात आधी घातपात असल्याचा आरोप केला होता. मात्र, शरद पवार यांनी हा केवळ अपघात असून यावर कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला दिला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली.

Municipal Corporation Navi Mumbai : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात नवी मुंबई अव्वल, पुण्याचा दुसरा क्रमांक

वैमानिकाच्या (पायलट) नियुक्तीपासून तर विमानातील इंधनाच्या (पेट्रोल) साठ्यापर्यंतची बारकाईने माहिती देताना त्यांनी घातपाताची शंका व्यक्त केली होती. त्यातच आता विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्लॅक बॉक्स हा या अपघाताचा सर्वात मोठा पुरावा मानला जात होता. या ब्लॅक बॉक्समधून अपघाताच्या आधी नेमके काय घडले, विमानातील व्यक्तींचे आपापसात काय संभाषण झाले, याची माहिती समोर आली असती.

Nagpur Municipal Corporation : भाजपची सत्ता, बेरोजगारांची फसवणूक अन् पोलीस तक्रार

“जर ब्लॅक बॉक्समधून काहीही निष्पन्न होत नसेल, तर ‘दाल मे कुछ तो काला है’ असेच म्हणावे लागेल,” असे सांगून वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील संशय अधिकच वाढवला आहे. या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला अध्यक्ष करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्ष होणार असतील तर आनंदच आहे; एक महिला एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी नमूद केले.