Ravi Rana : शेतकऱ्यांचा असंतोष, आमदार फाईल घेऊन पोहोचले मंत्रालयात

amravati-mla-ravi-rana-meets-ministers-for-nimna-pedhi-project-funds : निम्नपेढी प्रकल्पासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी; मंत्रालयात मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

Amravati जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी निम्नपेढी सिंचन प्रकल्प दीर्घकाळापासून रखडल्याने शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्पाच्या उर्वरित आणि दर्जेदार कामांसाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हा प्रकल्प केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात आणि गुणवत्तेसह पूर्ण व्हावा, अशी ठाम भूमिका मुंबईतील मंत्रालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मांडण्यात आली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैस्कर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, तसेच महसूल विभागाचे सहसचिव यादव यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत निम्नपेढी प्रकल्पासह अमरावती जिल्ह्यातील अन्य सिंचन प्रकल्पांच्या संथगतीवरही सखोल चर्चा करण्यात आली. सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निधी मिळणे अपरिहार्य असल्याचे प्रशासकीय स्तरावर स्पष्ट करण्यात आले.

ATS Operation : दहशतवादी संघटनेत युवकांची भरती, एटीएसची मोठी कारवाई

प्रकल्पांतर्गत पेढी नदीकाठच्या गावांच्या सुरक्षेसाठी दर्जेदार संरक्षण भिंत उभारणे, प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन विनाविलंब पूर्ण करणे आणि बाधित शेतीला जोडणारे पाणंद रस्ते तातडीने तयार करणे या मागण्यांवर बैठकीत विशेष भर देण्यात आला. निधीअभावी कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत, यासाठी ५०० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची इंस्टाग्रामवरून बदनामी, सायबर पोलिसांनी केले हँडलरवर गुन्हे दाखल

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि शेतकऱ्यांच्या सुविधा हा सरकारचा प्राथमिक अजेंडा असावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या तातडीच्या बैठकीनंतर आता शासन ५०० कोटींच्या निधीबाबत काय ठोस निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.