bishnoi-gang-threatens-akola-mla-security-tightened : दोन दिवसांची डेडलाईन आणि कॅलिफोर्निया कनेक्शन, कायद्यासमोर मोठे आव्हान
Akola अकोला जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गुन्हेगारी जगताची काळी सावली गडद होत असून, लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी धमकावण्याचे सत्र सुरू झाले आहे. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आले आहेत. शुभम लोणकरच्या नावाने आलेल्या एका धमकीच्या फोनमुळे अकोला पोलिसांसह संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी थेट ‘गेम’ करण्याची भाषा वापरल्याने आता लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आमदार साजिद खान पठाण यांच्या वैयक्तिक मोबाईलवर हा धमकीचा कॉल धडकला. कॉल करणाऱ्याने स्वतःचा संबंध बिष्णोई गँगशी असल्याचे सांगत, दोन दिवसांत १० कोटी रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. प्राथमिक तांत्रिक तपासात या कॉलचे मूळ अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशातून आलेल्या या धमकीमुळे या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेल्याचे स्पष्ट होत आहे.
Acb trap : मोठी कारवाई! परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!
धमकीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आमदार पठाण यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून चार सशस्त्र पोलीस जवान त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. आमदारांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या सार्वजनिक दौऱ्यांदरम्यान कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत.
Crime in Nagpur: नागपूरच्या किदवई हायस्कूलमध्ये खळबळ; मुख्याध्यापकाचा शिक्षकावर चाकूने हल्ला
या धमकीमागे ज्या शुभम लोणकरचे नाव घेतले जात आहे, तो मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक तरुण बिष्णोई गँगसारख्या खतरनाक टोळीसाठी काम करत असल्याच्या संशयाने तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची कमालीची गोपनीयता पाळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.
राजकीय नेत्यांना अशा प्रकारे धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा हा प्रकार अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा ठरत आहे. बिष्णोई गँगचा जिल्ह्यात वाढता हस्तक्षेप चिंताजनक मानला जात असून, पोलीस या आंतरराष्ट्रीय कॉलच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सायबर सेलची मदत घेत आहेत.








