व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home संपादकीय MLA Dr. Pankaj Bhoyar : एका उपक्रमातून मंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त!

MLA Dr. Pankaj Bhoyar : एका उपक्रमातून मंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त!

विश्लेषण

वर्धा

Paving the way to ministership through Seva Pandharvada : डॉ. पंकज भोयर यांच्या कार्याची राज्यपातळीवर दखल

यश पदरी पाडून घेण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक असते. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी वेगळं धाडसही करावं लागतं. अशी सुरुवात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत वर्ध्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’च्या माध्यमातून केली. यातून सर्वसामान्यांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ मिळू लागला. या कार्यक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आणि भोयर यांचा मंत्रिपदाचा मार्गही प्रशस्त झाला.

शासनाकडून जनसामान्यांकरिता विविध योजना राबविल्या जातात. परंतु ‘शासकीय काम महिनाभर थांब’, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. केवळ योजना असून चालत नाही तर, त्याचा लाभही जनतेपर्यंत पोहोचावा, याकरिता आमदार डॉ. पंकज भोयर चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने Wardha येथील विकास भवनात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करीत आहेत.

या ठिकाणी 25 शासकीय कार्यालयांचे स्टॉल लावले जातात. तेथे प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून विविध कामांकरिता येणाऱ्या नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावतात. या उपक्रमात असंख्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत असल्यानेच शासनानेही पहिल्याच वर्षी या उपक्रमाची दखल घेत राज्यभरात राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे वर्धेच्या आमदारांची संकल्पना राज्यभरात पोहोचली. यामुळेच की काय, राज्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देऊन पंखात आणखी बळ भरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दरवर्षीच्या सेवा पंधरवड्यातून आठ ते दहा हजार नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या जातात, याकरिता या सेवा पंधरवड्यादरम्यान जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभते. यंदाच्या पंधरवड्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खुद्द राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सरपंच, उपसरपंच व अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

error: Content is protected !!