Rohit pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा दिल्लीत स्फोटक आरोप

rohit-pawar-press-conference-delhi-ajit-pawar-plane-crash-vsr-company-rahul-gandhi : “राहुल गांधींनी लक्ष घालावे, नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या

New Delhi : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी अपघाताच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट राहुल गांधी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती केली.

अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यात विमान हवेत असतानाच एका बाजूला झुकताना दिसत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या दृश्यांमुळे अपघातामागे घातपाताचा अँगल असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

Chandrapur Mayor : गटबाजीमुळेच चंद्रपूर महापौरपद गेले; सपकाळांच्या आरोपांना राऊत यांचे प्रत्युत्तर!

रोहित पवार यांनी आरोप केला की, या प्रकरणात VSR नावाच्या कंपनीच्या मागे मोठे लोक असून कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. “व्ही एस आर कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. अनेक मोठे अधिकारी या कंपनीला मदत करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही याबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याचे सांगितले.

रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, मात्र ती उपलब्ध करून देण्यात आली नाही. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली असता तीही दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही प्रश्न विचारतो, तेव्हा आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगच्या मागे नक्की कोण आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सर्व घटनांमुळे अपघातामागे दुसरा काही अँगल आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

Thackeray brothers dispute : स्वीकृत नगरसेवक पदावरून तणाव वाढला

काही दिवसांपूर्वी मुंबईतही रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आता दिल्लीमध्येही त्यांनी तोच मुद्दा अधिक तीव्रतेने मांडला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि सर्व तथ्ये सार्वजनिक व्हावीत, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

दरम्यान, या आरोपांवर अद्याप संबंधित यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून चौकशीचा अहवाल काय सांगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

___