Tension in Nagpur over Rahul Gandhi’s statement; BJYM and Youth Congress face off : ‘एआय’ प्रदर्शन आणि राहुल गांधींच्या विधानावरून तणाव
Nagpur दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआय’ प्रदर्शनात चीनचे रोबोट ठेवल्याने राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. यावरून सध्या देशभरात वातावरण तापले असून, याचे पडसाद शनिवारी नागपूरमध्ये उमटले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात, तर युवक काँग्रेसने भाजपच्या विरोधात आंदोलन केले.
भाजयुमोचा आरोप आहे की, एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन करून देशाच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे कृत्य केले. हा काँग्रेसचा वैचारिक दिवाळखोरपणा आहे. १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि २० हून अधिक राष्ट्रप्रमुख उपस्थित असलेल्या या प्रतिष्ठित कार्यक्रमात अशा प्रकारचा ‘धिंगाणा’ घालणे, हे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्याचे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने भारताची बदनामी करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Grampanchayat Elections : कार्यकाळ संपुष्टात आला, आता ५५५ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक!
राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचे पोस्टर झळकवत टिळक पुतळा येथे जोरदार घोषणाबाजी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नाचक्की करणाऱ्या बेजबाबदार कार्यकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचा महापौर २४ कॅरेट शुद्ध भाजपचाच, भिवंडीत तुमचा आहे का?
दुसरीकडे, भाजप दडपशाही करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी जे काही बोलले ते सत्य असून, ते भाजपला सातत्याने उघडे पाडत आहेत. त्यामुळेच त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘एपस्टाईन फाईल्स’ उघड होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने दबावाखाली अमेरिकेसोबत व्यापार करार केला, असा आरोपही करण्यात आला.
Vijay Wadettiwar : ज्यांनी अफवा पसरवली त्यांना पागल कुत्रा चावला असेल, वडेट्टीवारांचा टोला कुणाला?
“मोदी सरकारने देशाला अमेरिकेकडे गहाण टाकले असून शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. हे वास्तव राहुल गांधी मांडत असल्याने त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही, असा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने अशोक चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान ‘मोदी सरेंडर’च्या घोषणा देण्यात आल्या. भाजपकडून युवक काँग्रेसवर देशाची प्रतिमा खराब करण्याचा खोटा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात आणण्याचे काम स्वतः नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला.








