व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांमुळे चंद्रपूरकरांना मोठा दिलासा ; पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २००४...

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांमुळे चंद्रपूरकरांना मोठा दिलासा ; पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २००४ घरांसाठी २३० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राची हिरवी झेंडी

sudhir-mungantiwar-chandrapur-pm-awas-yojana-2004-houses-approval-230-crore :मुनगंटीवारांमुळे चंद्रपूरकरांना मिळणार हक्काचे घर

Chandrapur : चंद्रपूर शहरातील गरजू आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवीन चंद्रपूर म्हाडा कॉलनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २००४ घरांच्या सुमारे २३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वी १० हजार घरकुलांच्या व्यापक प्रकल्पाची संकल्पना मांडत त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यास पुढाकार घेतला होता. केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांनी राज्यमंत्री पंकज भोयर तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीनंतर योजनेच्या अंमलबजावणीत आवश्यक प्रशासकीय हालचालींना वेग मिळाला.

Sanjay Raymulkar : आम्ही प्रत्यक्ष कामे केली, तुम्ही एखादे काम मंजूर तरी करून आणले का?

या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक म्हणून पहिल्या टप्प्यातील २००४ घरांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित घरकुल प्रकल्पालाही लवकरच गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून ‘प्रत्येकाला स्वतःचे घर’ ही संकल्पना साकार करण्याच्या दिशेने चंद्रपूरने निर्णायक पाऊल टाकले आहे. मंजुरीनंतर शहरातील नागरिकांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार मानत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दरम्यान, चंद्रपूरच्या सुसज्ज आणि शाश्वत विकासासाठी विविध पातळ्यांवर कामांना गती देण्यात येत आहे. गायत्री शक्तिपीठ परिसराची पाहणी करून संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते चौपदरीकरण, नियोजित पार्किंग व्यवस्था आणि परिसराचे सौंदर्यीकरण यासाठी नियोजन करण्यात आले आहे. म्हाडाच्या जागेत ऑक्सिजन पार्क, सार्वजनिक बागा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. तसेच पोलिस गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून नागपूर रोड ते देवाडा शिव ३० मीटर रस्त्याच्या प्रस्तावासंदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत.

TET teachers : टीईटी अपात्र शिक्षकांच्या पदोन्नतीला पूर्णविराम

‘नवीन चंद्रपूर’ घडविण्याच्या ध्येयाने आ. मुनगंटीवार सातत्याने आग्रही असून पायाभूत सुविधा, स्वच्छता, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे या सर्व घटकांचा समन्वय साधत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देत आहेत. केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने समन्वय साधत विविध प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. परिणामी, चंद्रपूरला आधुनिक, सुबक आणि अधिक सुसज्ज शहर म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात असून ‘नवीन चंद्रपूर’ची संकल्पना प्रत्यक्ष आकार घेताना दिसत आहे.

error: Content is protected !!