Nagpur Municipal corporation : भाजपने मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठेवले वेटिंगवर!

NCP-Shivsena-not-included-in-any-committee-by-BJP : राष्ट्रवादी, शिवसेनेचा एकाही समितीत समावेश नाही

Nagpur नागपूर महापालिकेची निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली होती. भाजपचे १०२ तर शिवसेनेचा फक्त एकच नगरसेवक निवडून आला आहे. भाजपने आठ जागांवर युती करताना सहा ठिकाणी आपलेच उमेदवार उभे केले होते. फक्त त्यांच्या हाती धनुष्यबाण दिला होता. शिवसेनेचा निवडून आलेला एकमेव उमेदवार गणेश चर्लेवार हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाच्या आभा पांडे या एकमेव निवडून आल्या आहेत. मात्र या दोन्ही नगरसेवकांचा एकाही समितीत समावेश करण्यात आला नाही.

महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते. स्थायी समितीवर भाजपने सर्व महिलांनाच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ महिलांची नियुक्ती करण्यात आली. आभा पांडे यांना या समितीत स्थान दिले जाईल असे सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे आभा पांडे यापूर्वी स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी त्या काँग्रेसमध्ये होत्या. इतर समित्यांमध्येसुद्धा त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. गणेश चर्लेवार यांच्या उमेदवारीसाठी संघाने नाव सुचवले होते.

Shivani Dani : वडेट्टीवारांचे भाकित अन् तसेच घडले, दाणींच्या हाती महापालिकेची तिजोरी!

शिवसेनेसोबत ॲडजेस्टमेंट करायची असल्याने त्यांच्या हाती धनुष्यबाण देण्यात आला होता. संघ मुख्यालय असलेल्या रेशीमबाग प्रभागातून ते निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर रेशीमबाग परिसराच्याच देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते प्रथमच निवडून आले असले तरी त्यांची एखाद्या महत्त्वाच्या समितीत नियुक्ती केली जाईल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र भाजपने आपल्या दोन्ही मित्रपक्षाच्या नगरसेवकांना वेटिंगवर ठेवले आहे.

Budget session 2026 : “मंत्रालय चालते पगारावर, फाईली चालतात पैशावर”!

मंगळवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात मनपाची विशेष सभा पार पडली. यामध्ये पक्षीय व तौलिक संख्याबळानुसार १६ सदस्यांच्या स्थायी समितीवर भाजपचे अकरा, काँग्रेस-शिवसेना (उबाठा) प्रणीत नागपूर महाविकास आघाडीचे चार व एमआयएम- इंडियन मुस्लिम लीग प्रणीत मुस्लीम बहुजन विकास आघाडीचा एक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.