clash-in-the-legislature-over-comparison-of-regional-poverty-buldhana-konkan-bhaskar-jadhav : प्रादेशिक गरिबीच्या तुलनेवरून विधिमंडळात खडाजंगी; सोशल मीडियावर उमटले तीव्र पडसाद
Buldhana शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर विधानभवनात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. बुलढाण्याचा उल्लेख करत त्यांनी ‘घाटाखालचा’ आणि ‘घाटावरील’ असा संदर्भ दिल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत.
मंत्रीपदाच्या कार्यकाळात ते बुलढाण्यात आले होते. त्यावेळी स्थानिकांनी विविध मागण्या मांडत दिलासा देणारे आश्वासन अपेक्षित असल्याचे सांगितले होते. मात्र, भावनिक आश्वासनांपेक्षा वास्तव मांडणे अधिक गरजेचे असल्याचे आपण स्पष्ट केल्याची आठवण त्यांनी सभागृहात करून दिली. “बुलढाण्यापेक्षा माझा कोकण अधिक गरीब आहे,” असे आपण त्या वेळी म्हटल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर
या विधानानंतर जिल्ह्यात ‘गरिबीची तुलना’ या मुद्द्यावरून चर्चा पेटली आहे. काही नागरिकांचे म्हणणे आहे की, बुलढाण्यासारख्या दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त जिल्ह्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणे अपेक्षित असताना ‘कोण अधिक गरीब’ अशी तुलना करणे योग्य होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, काही जणांच्या मते जाधव यांनी प्रादेशिक विषमता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला; मात्र शब्दांची निवड व संदर्भामुळे गैरसमज निर्माण झाले. एकूणच, या वक्तव्यामुळे बुलढाण्याच्या विकास, शेती व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, आता अपेक्षा आहे ती केवळ तुलना नव्हे तर ठोस धोरणात्मक निर्णयांची.








