Chief-Minister-recounted-the-true-history-of-Tipu-Sultan-rebukes-Congress-leaders : ब्रिटिशांच्या विरोधात लढले हे खरे, मात्र ते स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढले
Nagpur मागील आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानाशी तुलना केली होती. टिपू सुलतान हा देखील छत्रपतींनी एवढाच महान राजा होता. त्यांनाही महाराजांप्रमाणे सन्मान दिला जावा अशी मागणी केली होती. त्यावरून मोठा वाद उफाळून आला होता. ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. वाढता रोष बघून सपकाळांनी दिलगिरी व्यक्त करताना आपले वक्तव्य ट्विस्ट केल्याचा दावा केला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि टिपू सुलतानाचा खरा इतिहाससुद्धा सांगितला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमचा टिपू सुलतानाच्या तसबिरीवर आक्षेपच नाही. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेल्या तुलनेवर आहे. टिपू सुलतानाने ७५ हजार हिंदूंची कत्तल केली. ते ब्रिटिशांच्या विरोधात लढले हे खरे आहे. मात्र ते स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढले. जनतेच्या हितासाठी लढले नाही. हे मात्र आजवर कोणी सांगितले नाही. इतिहासाच्या पुस्तकातही त्याचा उल्लेख केला नाही. काँग्रेसने खरा इतिहास दडवून ठेवला नसता तर आज भारतीतील एकाही मुस्लिमाने टिपू सुलतान आणि औरंगजेबाजाला हिरो मानले नसते. आजवर एनसीईआरटीच्या पुस्तकातून मोगलांचा इतिहास काँग्रेसने सांगितला.
Rohit pawar : “बिघडलेले विमान अजितदादांना दिले का?” एफआयआर नोंदवण्यास नकारावर रोहित पवारांचा संताप
या पुस्तकात मोगलांसाठी १७ पाने देण्यात आली होती आणि छत्रपतींचा उल्लेख अभ्यासाच्या पुस्तकात फक्त एक पॅरेग्राफचा ठेवण्यात आला होता. मात्र मोदी सरकारने आता खरा इतिहास जगासमोर आणायला सुरुवात केली आहे. एनसीआरटीईच्या पुस्तकात र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासासाठी २० पाने देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचा काँग्रेसला विरोध आहे का? असा सवालही त्यांनी केला.
love jihad law : भिगवण प्रकरणानंतर महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायद्याची गती
भारतात आजही देशभक्त मुस्लिम आहेत. त्यांना आमचा कदापी विरोध नाही. मात्र जे लोक आक्रमणकारी आणि हिंदूंची कत्तल करणाऱ्या हिरो समजत असले, त्यांचे नाव घेऊन राजकारण करीत असले तर आम्ही त्यांना सोडणार नाही इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना आपल्या भाषणाची सुरुवातच शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानाच्या वादापासून केली.








