व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunil tatkare controversy : अजित पवार हयात असताना दिलेले सेल अध्यक्षांचे राजीनामे...

Sunil tatkare controversy : अजित पवार हयात असताना दिलेले सेल अध्यक्षांचे राजीनामे मंजूर !

ajit-pawar-resignation-cells-approved-after-death-sunil-tatkare-controversy : सुनील तटकरे यांच्याबाबत नाराजीची चर्चा

Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी २६ जानेवारी रोजी पुण्यात आपले राजीनामे त्यांच्या स्वाधीन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्या वेळी संबंधित राजीनाम्यांवर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. आता अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाने या सर्व राजीनाम्यांना कारणमीमांसा न करता मंजुरी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी आणि मोटार मालक वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांनी आपापले राजीनामे सादर केले होते. हे सर्व राजीनामे प्रलंबित ठेवण्यात आले होते. मात्र अलीकडे पक्ष स्तरावर ते मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे.

ZP elections : मेहकरात उद्धवसेनेची आक्रमक चाल; निवडणुकीपूर्वीच जोरदार तयारी

राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. संघटनात्मक पातळीवरील मतभेद आणि धोरणात्मक निर्णयांबाबत असमाधान असल्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत पक्षाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Sanjay Gaikwad : चिखलीत संपर्क मोहीम, गायकवाड पिता-पुत्र मैदानात!

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून संघटनात्मक फेरबदलांची प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रलंबित राजीनाम्यांना मंजुरी देण्यामागील नेमके कारण काय, तसेच पुढील नियुक्त्या कधी होणार, याकडे कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!