Dr. Abhijeet chaudhari : अखेर नागपूर महापालिका आयुक्तांची पुण्यात बदली; गडकरी, ठाकरे, दटके यांनी केल्या होत्या तक्रारी

Nagpur-municipal-corporation-commissioner-transferred-to-pune : माजी नगरसेवकांची देखील होती नाराजी, जिल्हाधिकारी इटनकर यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता कार्यभार

Nagpur नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांची अखेर बदली करण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी आयुक्तांना नागपूर शहरातून दुसरीकडे पाठवा अशी मागणी अनेकदा केली होती. मात्र राज्य शासनाने कोणाचेच ऐकले नव्हते. त्यानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी झाल्यानंतर त्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. ती यावेळी खरी ठरली.

आता नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या प्रशासकीय वर्तुळात नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर महापालिकेत येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे चौधरी यांच्या बदलीच्या आदेशात जिल्हाधिकारी इटनकर यांना महापालिकेचे सूत्र सोपवून त्वरित पुण्याचा तत्काळ पदभार स्वीकारावा असे म्हटले आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर अभिजित चौधरी सर्वाधिक काळ प्रशासक म्हणून कार्यरत होते. या काळातच त्यांच्याबाबत माजी नगरसेवकांचा रोष होता.

Vijay Wadettiwar : स्फोटकांच्या कारखान्यात दीड वर्षात ४३ कामगारांचा मृत्यू; काही करणार की नाही?

लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही, तक्रारींची दखल घेतली जात नाही, छोट्या छोट्या कामांसाठी चकरा माराव्या लागतात, गटारे स्वच्छ करण्यासाठीसुद्धा निधी देत नसल्याच्या तक्रारी भाजपच्याच माजी नगरसेवकांच्या होत्या. कचरा संकलनावरून आमदार विकास ठाकरे आणि आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. नागपूर शहरात नीट कचरा संकलन होत नाही. एक दिवसाआड कचरा संकलन केले जाते.

Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत असाही ‘महिला राज’; दौऱ्यातून सत्तापक्ष नेत्यालाच डावलले

त्यामुळे कचरा संकलनाचे कंत्राट रद्द करा आणि नवे कंत्राटदार नेमा अशी मागणी आमदारांनी केली होती. मात्र संबंधित कंत्राट संपल्यानंतरही अद्यापही आयुक्त चौधरी यांनी त्यांचे कंत्राट रद्द केले नाही. नगरसेवकांच्या आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा दखल घेऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी थेट महापालिकेच्या मुख्यालयातच जनता दरबार घेतला होता. त्यावेळी गडकरी यांनीसुद्धा अभिजित चौधरी यांना नाग यांच्याऐवजी दुसरा आयुक्त नेमण्याचे आदेश दिले होते.