Eknath-Shinde-leader-joins-uddhav-thackeray-shivsena : मुंबईत कार्यकर्त्यांसह केला पक्षप्रवेश, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
Jalgao उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत आयोजित कार्यक्रमात उन्मेष पाटील यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिंदे यांनी पाटील यांचे स्वागत करत त्यांना पक्षात महत्त्वाची भूमिका दिली जाईल, असे संकेत दिले.
Rajya sabha election : राज्यसभेच्या जागेवरून मविआमध्ये खळबळ, आदित्य ठाकरे नाराज
उन्मेष पाटील हे जळगाव जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून काम केले होते. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला.
दरम्यान, ठाकरे गट सोडून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना (UBT) ला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात पाटील यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव असल्याने या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Water crisis : खामगाव पालिकेत एमआयएमचे ‘पुंगी बजाओ’; पाणी-स्वच्छतेच्या प्रश्नावर संताप
पक्ष प्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उन्मेष पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. खासदार म्हणून त्यांनी जळगाव मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचा उल्लेख करत आगामी काळात त्यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाबाबत नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Vishwas patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक
उन्मेश पाटील यांच्यासोबत विविध समाजाचे प्रतिनिधी आणि ओबीसी नेते संजय चौधरी, विजू गवळी यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. या भव्य पक्षप्रवेशावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आणि स्थानिक नेते गुलाबराव पाटील व किशोर आप्पा पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती. “शिवसेना हा सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे,” असे सांगत शिंदे यांनी नव्याने आलेल्या सहकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








