District hospitals : जिल्हा रुग्णालयातील एमआरआय युनिट बंद; रुग्णांची धावपळ

mri-units-not-working-district-hospital : बाहेरच्या यंत्रणेला चालवायला द्या, मनसेची मागणी

Buldhana जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआरआय युनिटची इमारत व यंत्रणा तयार असूनही ती रुग्ण सेवेसाठी सुरू करण्यात आलेली नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे युनिट आठ दिवसांत सुरू करावे, अन्यथा ते ताब्यात घेऊन बाह्य यंत्रणेमार्फत चालविण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने दिला आहे.
या संदर्भात मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी ५ मार्च रोजी राज्याच्या प्रधान सचिवांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी केली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय आरोग्य केंद्र असून येथे वैद्यकीय महाविद्यालयही सुरू होत आहे. मात्र रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याची टीका मनसेने केली आहे. कधी डॉक्टरांची कमतरता तर कधी एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!

सध्या एमआरआय सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले असून आवश्यक यंत्रसामग्रीही उपलब्ध आहे. मात्र प्रशासनातील उदासीनता आणि यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे हे युनिट अद्याप सुरू झालेले नाही. परिणामी रुग्णांना तपासणीसाठी अकोला, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव येथे पाठवावे लागत असल्याचेही मनसेने निदर्शनास आणून दिले.

Katol blast : आणखी तीन महिलांनी घेतला अखेरचा श्वास, स्फोटाच्या वेदनांमध्ये होरपळताहेत कुटुंब

दूरवर जाऊन तपासणी करणे हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांसाठी परवडणारे नसून त्यामध्ये वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एमआरआय युनिट तात्काळ सुरू करून जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेने आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक, प्रधान सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.