maharashtra budget session 2026 : विधिमंडळात प्रश्न अन् जिल्हा उपनिबंधकांची उचलबांगडी!

dr-pravin-lokhande-transferred-maharashtra-budget-session : डीडीआर डॉ. प्रवीण लोखंडे यांची बदली; कामकाजासंदर्भात होत्या तक्रारी

Akola जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांची अखेर नागपूर येथे प्रादेशिक उपसंचालक (साखर) पदावर बदली करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सोमवार, दि. ९ मार्च रोजी जारी करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा कारवाई करून गुन्हा नोंद केल्यानंतरही डीडीआर लोखंडे यांना पाठीशी का घातले जाते, असा सवाल आमदारांनी २५ फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला होता. या प्रश्नानंतर त्यांच्या बदलीचा आदेश निघाल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Amravati Politics : दर्यापूर काँग्रेसला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपमध्ये

डॉ. लोखंडे यांचा परिविक्षाधीन कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही. अमरावती येथे तालुका उपनिबंधक म्हणून कार्यरत असताना तसेच त्यानंतर अकोला येथे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) पदावर असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या विरोधात कारवाई करून गुन्हे नोंद केले होते. याशिवाय त्यांच्या कामकाजासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्र चौकशीही सुरू आहे.

Akola municipal coperation : अतिक्रमण व पुररेषा ओलांडून बांधकामाचा मुद्दा; स्वीकृत सदस्य नियुक्तीवरून वाद

प्रशासकीय तसेच न्यायालयीन कारवाईत कोणताही हस्तक्षेप होऊ नये, या उद्देशाने त्यांची बदली करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५ फेब्रुवारी रोजी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कथित गैरव्यवहारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

Bacchu Kadu : कडूंचे आंदोलन मागे; पुन्हा एकदा सामंत यांची मध्यस्थी!

डॉ. लोखंडे यांच्या बदलीचा आदेश मिळताच ९ मार्च रोजीच त्यांनी पदाचा कार्यभार सोडला. त्यांच्या जागी अद्याप नवीन जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती झालेली नसल्याने, बार्शिटाकळी येथील सहायक निबंधक देवेंद्र शेकोकार यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.