व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?

दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?

 

रामदास कदमांच्या स्फोटक आरोपांनी महायुतीत खळबळ

Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्याने महायुतीमध्ये प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचे होते आणि राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक दावा करत कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी याच अँगलने करण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, अजितदादांच्या हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुनील तटकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे फेटाळून लावून दिल्या होत्या. असे काही ठरले असते तर मला नक्कीच माहीत असते, दादा माझ्याशी याबद्दल बोलले असते, असा दावा त्यावेळी तटकरेंनी केला होता. मात्र, आता त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार होते, असे म्हणत अचानक ‘घुमजाव’ केले आहे.

फळ बागा संकटात धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या आ. वानखेडे यांची आग्रही मागणी !

त्यांच्या या यू-टर्नमुळे पक्षातूनच त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. इतके दिवस तटकरेंनी ही गोष्ट का लपवून ठेवली आणि आताच त्यांना याची कशी आठवण झाली?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजकीय वर्तुळात सध्या सुनील तटकरे यांना पक्षात पद्धतशीरपणे डावलले जात असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याशी त्यांचे पटत नसल्याचे व त्यांना बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळेच तटकरेंनी हे घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.

यातच शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरेंवर निशाणा साधत, दादांच्या घातपातात त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. कदम यांनी ऐन राजकीय टप्प्यावर साधलेल्या या निशाण्यामुळे महायुतीत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता या गंभीर आणि थेट आरोपांवर सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

 

error: Content is protected !!