व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे ऐतिहासिक पाऊल, धाराशिवकरांकडून कौतुक!

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे ऐतिहासिक पाऊल, धाराशिवकरांकडून कौतुक!

mungantiwar-demand-bharatratna-to-savarkar-organisation-from-dharashiv-praises : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी माजी मंत्र्याप्रती कृतज्ञता

Mumbai स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच विधानसभेत केली. ही मागणी अत्यंत ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेमी दृष्टिकोनातून केली गेलेली आहे. या मागणीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत धाराशिव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंचचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी मुनगंटीवारांना पत्र लिहून आभार मानले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बलिदानाचे महत्त्व सांगणारा प्रत्येक पाऊल राष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक अमूल्य ठेवा आहे. मुनगंटीवारांनी केलेल्या या मागणीमुळे सावरकरप्रेमी जनतेमध्ये विश्वास आणि आदर वाढला आहे. मुनगंटीवारांचे हे ऐतिहासिक आणि आदर्श पाऊल आहे, असे मकरंद पाटील यांनी म्हटले आहे.

Sudhir mungantiwar : धारदार आयुधांचा ‘अनुभवी’ वापर आणि आ.सुधीर मुनगंटीवार यांची धडाकेबाज मांडणी

स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच, कळंब (जिल्हा धाराशिव) कडून आम्ही मुनगंटीवारांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्याचे स्वागत करत, त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कळंब येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करतो. यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कळंब येथील कार्यक्रमात मुनगंटीवार यांची उपस्थिती आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरेल, असे भावनिक उद्गार पाटील यांनी काढले आहे.

error: Content is protected !!