व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Criem News: बुलढाणा हादरले! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून खासगी फोटोच्या आधारे ब्लॅकमेल

Criem News: बुलढाणा हादरले! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून खासगी फोटोच्या आधारे ब्लॅकमेल

buldhana-teacher-mobile-hack-blackmail-obscene-video-call-threat-case : व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडत शरीरसंबंधांची धमकी

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून एका २७ वर्षीय शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून तिच्या खासगी फोटो व व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेला व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडले तसेच शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यास बदनामी करण्याबरोबरच जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा परिसरातील एका २७ वर्षीय शिक्षिकेचा मोबाईल आरोपी ऋषिकेश गिरी याने बेकायदेशीरपणे हॅक केला. मोबाईल हॅक केल्यानंतर त्याने शिक्षिकेचे व्हॉट्सॲप चॅट्स, ईमेल तसेच मोबाईल गॅलरीमधील अत्यंत खासगी फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले. या माहितीचा वापर करून त्याने पीडितेला सतत धमकावण्यास सुरुवात केली.

supreme-court : ओबीसी क्रिमिलेयर ठरवताना पालकांचे वेतन एकमेव निकष ठरू शकत नाही

“तुझे खासगी फोटो आणि व्हिडिओ तुझ्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करीन,” अशी धमकी आरोपीने शिक्षिकेला दिली. बदनामीच्या भीतीमुळे पीडिता मानसिक तणावाखाली असताना आरोपीने तिच्यावर आणखी दबाव टाकला. त्याने वारंवार व्हिडिओ कॉल करून शिक्षिकेला विवस्त्र होण्यास भाग पाडले. या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून आरोपीने ते पीडितेच्या बहिणीलाही पाठवले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यापुढे आरोपीने शिक्षिकेला शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत धमक्या दिल्या. जर त्याची मागणी पूर्ण केली नाही तर तिच्यासह तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सततचा छळ आणि मुलाच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता पीडित शिक्षिकेने अखेर सोनाळा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Nitin Gadkari : नांदुरा उड्डाणपुलासाठी आमदारांचे गडकरींना साकडे

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (ई), ६७ आणि ६७ (अ) अंतर्गत आरोपी ऋषिकेश गिरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून सायबर सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

__

error: Content is protected !!