व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : राजमाता राणी हिराई जन्मोत्सव चंद्रपुरात आता शासकीय स्तरावर साजरा...

Sudhir mungantiwar : राजमाता राणी हिराई जन्मोत्सव चंद्रपुरात आता शासकीय स्तरावर साजरा होणार

rajmata-rani-hirai-janmotsav-government-celebration-chandrapur-sudhir-mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

Chandrapur: चंद्रपूर शहराच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या आणि गोंडवानाची ‘शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राणी हिराई यांचा जन्मोत्सव यंदा प्रथमच चंद्रपुरात शासकीय स्तरावर दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना पत्र लिहून राजमाता राणी हिराई यांच्या जन्मोत्सवासाठी शासकीय स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. १२ मार्च २०२६ रोजी राज्य शासनाने यासंदर्भात शासन निर्णय काढत निधी मंजुरी दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ladki-bahin-yojana : लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये ९५०० कोटींची घट

राजमाता राणी हिराई यांच्या दूरदृष्टीपूर्ण कारभारामुळे चंद्रपूर शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली. माता महाकाली मंदिर आणि राजा बिरशहा यांची समाधी यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंची उभारणी करून त्यांनी शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध केले. त्यांच्या या दैदिप्यमान कार्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि चंद्रपूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समिती चांदागडचे अध्यक्ष शांताराम उईके यांनी या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे निधीची मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने राजमाता राणी हिराई जन्मोत्सवासाठी निधी मंजूर केला आहे.

या निर्णयामुळे चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. तसेच राजमाता राणी हिराई यांच्या कार्याचा गौरवशाली इतिहास अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

leopard in city : आता वाघ, बिबट्या गावात येताच ‘एआय’ करणार अलर्ट

दरम्यान, २० एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव परिसरात सोमेश्वर मंदिराजवळ हा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात संगीत, वादन आणि नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून वन उत्पादन आणि हस्तकला प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गोंडकालीन संस्कृतीला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना देखील आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

error: Content is protected !!