व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Accident : तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार, आठ गंभीर जखमी

Accident : तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार, आठ गंभीर जखमी

 

A major accident on the Karanja-Poha road has caused panic in the area : कारंजा-पोहा रस्त्यावरील भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ

Washim : कारंजा-पोहा रस्त्यावरील तुळजापूर गावाजवळ २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात एका महिलेसह तीन जण ठार झाले, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

एमएच ३७ टी ४६४१ क्रमांकाचे महिंद्रा पीकअप वाहन भरधाव वेगाने पोहा येथून करंजाच्या दिशेने जात होते. तेव्हा समोरून येणाऱ्या प्रवासी ऑटोला पीकअपने जोरदार धडक दिली. या धडकेने ऑटोवरील नियंत्रण सुटून तो मालवाहू ऑटोला धडकला. तीन वाहनांच्या या अपघातात शालिनी उत्तम लोखंडे (२५, रा. बेलमंहत), निलेश रमेश जनातसरे (२५, रा. पोहा), व मारुती पिराजी शिंदे (७०, रा. मीरळ) हे ठार झाले.

Gigolo News : कारच्या लोकेशनवरुन फुटले पत्नीचे बींग!

 

जखमींमध्ये यांचा समावेश
आसीफ खान कलीम खान (३८, रा. पोहा), इमरान पठाण (५०, रा. दीपक चौक, अकोला), व शाहिद नाजीम खान (१३, रा. करीम नगर, कारंजा) यांचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये निर्मला ज्ञानेश्वर मानकर (६०), फौजिया परवीन आसिफ पठाण (२७), अशोक महादेव नितनवरे (३२) व मेधा अशोक नितनवरे (२८) यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

Sudhir Mungantiwar : अयोध्येतील राम मंदिराची वर्षपूर्ती ; चंद्रपूरवासियांना आठवले मुनगंटीवार !

मदत कार्य
घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन संस्थांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे. कारंजा पोलीस अधिक तपास करत आहेत. वाहनचालकांनी रस्त्यावर वेगावर नियंत्रण ठेवावे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

error: Content is protected !!